Garlic for Clean Toilet: बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अस्वच्छ होते. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. परंतु कित्येकवेळा टॉयलेट-बाथरुम साफ केले तरी त्यातून दुर्गंध येतो. त्यामुळे आम्ही काही सोपे किचन हॅक्स तुम्हाला सांगणार आहोत, ते बाथरूमची साफसफाई करण्यात मदत करू शकतात. आरोग्यासाठी लसून किती उपयोगी आहे, हे आपल्याला माहिती आहे. लसूण आजारांपासूनही सुटका करतो. पण तुम्हाला माहित आहे का की लसणाने बाथरुमही चकचकीत होतं.
फक्त रात्रभर लसणाची पाकळी कमोडमध्ये टाका
शौचालय स्वच्छ करण्यासाठी लसूण दोन प्रकारे वापरता येतो. प्रथम, लसणाची एक पाकळी रात्रभर कमोडमध्ये टाका. रात्री अशासाठी कारण, लसणाचा वापर अशा वेळी करायचा आहे जेव्हा कमोडचा कमीत कमी वापर केला जाईल. सकाळी उठल्यावर कमोड किंवा पॅन फ्लश करा.लसणात अॅलिसिन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे लसणाचा वास येतो. या घटकामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. जे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी फायद्याचे आहे.
हेही वाचा – ट्रेनमध्ये पंख्यांच्या बाजूला छोटी छिद्रे का असतात? प्रवाशांसाठी करतात ‘हे’ मोठे काम, नसतील तर…
दुसरी पद्धत थोडा वेळ घेणारी आहे. एका भांड्यात एक कप पाणी उकळा. उकळत्या पाण्यात लसूणाच्या एक किंवा दोन पाकळ्या टाका.आणि ते पाणी कमोडमध्ये टाका.
पाहा व्हिडीओ –
व्हिनेगर
तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि रात्रभर सोडा. किमान दोन कप व्हाईट व्हिनेगर वापरा. कोका-कोलासुद्धा व्हिनेगरप्रमाणेच काम करू शकते. पण ते 1 तासापेक्षा जास्त काळ सोडू नका. फक्त पॉटचे डाग काढून टाका.