Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची सत्ता पुन्हा कोणाच्या हातात जाणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे, २३ नोव्हेंबर रोजी याच उत्तर मिळेल. नेमका कौल कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे.

मतदान हा प्रत्येकाचा महत्त्वाचा हक्क आणि अधिकार आहे. आपल्या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला जर निवडणुकीमध्ये उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटा हा पर्याय वापरू शकता. पण, काहीही झाले तरी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नोटा काय असतं? चला तर मग जाणून घेऊ या…

Mumbai Local At Dadar Station Viral Video Passenger Takes A Risky Pathway To Change Platforms
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?

नोटा म्हणजे काय?( what is this nota?)

तुम्हाला हे माहीत असेल की, भारतात मतदान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) वापरले जाते. या यंत्रावर निवडणुकीत उभा असलेला उमेदवार आणि त्याचा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अशी यादी दिलेली असते. तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान केले जाते. तुम्ही जर कधी मतदान केले असेल तर तुम्ही पाहिले असेल की, भारतीय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वरील उमेदवारांच्या यादीच्या तळाशी एक बटण असते, त्यावर ‘वरीलपैकी काहीही नाही’ म्हणजेच ‘None Of The Above’ (NOTA), असे लिहिलेले असते. मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर अशा परिस्थितीत मतदार नोटा हा पर्याय निवडू शकतो. नोटा या पर्यायाद्वारे मतदारांना सर्व उपलब्ध उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळतो.

‘ईव्हीएम’मशीन वापरण्यापूर्वीदेखील मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा म्हणजे NOTA हा पर्याय वापरण्याचा अधिकार होता. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ (ईटी)च्या वृत्तानुसार, ‘ईव्हीएम’मशीन वापरण्यापूर्वी मतपत्रिकेद्वारे मतदारांसमोर कोणत्याही उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का न मारता, कोरी मतपत्रिका टाकण्याचा पर्याय उपलब्ध होता, ज्याचा अर्थ मतदारांनी सर्व उपलब्ध उमेदवारांना नाकारले आहे असा होतो. पूर्वी नकारात्मक मतदानासाठी मतदारांना मतदान अधिकार्‍याकडे जावे लागत असे. पण, NOTA मुळे आता असे करण्याची आवश्यकता नाही.

मतदारांना केव्हा दिला NOTA वापरण्याचा आधिकार? (When did voters get the right to use NOTA?)

२७ सप्टेंबर २०१३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की, मतदारांना त्यांची मतपत्रिका देताना “वरीलपैकी काहीही नाही” निवडण्याचा पर्याय असावा आणि निवडणूक आयोगाने सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये या पर्यायासाठी एक बटण स्थापित करणे अनिवार्य केले. मतदारांना “वरीलपैकी काहीही नाही” निवडण्याचा पर्याय देण्यासाठी ECI ने एक विशिष्ट चिन्ह सादर केले. हे चिन्ह सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (EVM) शेवटच्या पॅनेलमध्ये दिसते.

हेही वाचा – मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

राजकीय पक्षांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत करतो NOTA (NOTA helps political parties to select suitable candidates)

असंतोष व्यक्त करण्याची क्षमता अधिकाधिक लोकांना मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल, या कल्पनेमुळे निवडणूक प्रक्रियेत NOTA समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, NOTA मत हे एक तटस्थ मत आहे, जे त्यास नकारात्मक मतापेक्षा वेगळे करते. २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, NOTA पर्यायाचा समावेश केल्याने “खरोखरच राजकीय पक्षांना योग्य उमेदवार निवडण्यास भाग पाडले जाईल.”

NOTAला सर्वाधिक मते मिळाली तर? (What if NOTA gets the most votes?)

अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, समजा एखाद्या मतदारसंघात NOTA मतांना सर्वाधिक मते मिळाली तर काय होते? जर असे झाले तर अशा परिस्थितीमध्ये दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या पुढील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते..

हेही वाचा –महाराष्ट्रात पहिल्या निवडणुकीपासून कसं बदललं मतदारसंघांचं गणित? ही संख्या २८८ पर्यंत कशी पोहोचली?

NOTA खरंच महत्त्वाचे आहे का?(Does NOTA really matter?)

NOTA ची मते खरोखरच महत्त्वाची आहेत का, यावर अनेक जण तर्क करतात. काही लोकांच्या मते, भारतीय प्रणालींमध्ये NOTA चे कोणतेही निवडणूक मूल्य नाही, कारण सिद्धांतानुसार, NOTA ला जास्तीत जास्त मते मिळाली तरीही सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार विजेता घोषित केला जाईल. पण, आणखी एका वेगळ्या सिद्धांतानुसार, “निवडणुकीच्या निकालासाठी NOTA मते महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते राजकीय पक्षांची मते वजा करतात, ज्यामुळे विजय मिळवणे अवघड होते.”