How to Apply for PM Awas Yojana: २५ जून २०१५ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली होती. ही योजना आधी २०२२ पर्यंत होती, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण ३.२१ कोटी घरं बांधण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी घरं बांधण्याचा निर्णय जून महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

how to apply for ration card online
रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती, फायदे काय? जाणून घ्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ayushman bharat yojana benefits
‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या
The sister cried out for her brother Video Viral
‘दादा तू परत ये ना..’ पाण्यात उडी मारणाऱ्या भावासाठी बहिणीने केला आक्रोश; हृदयस्पर्शी Video Viral
Diwali Online Shopping Scams
Online shopping scams: एक क्लिक आणि लाखोंचा गंडा; दिवाळीला खरेदी करताना काय काळजी घ्याल?
Ajit Pawar
Ajit Pawar : “एकदा गृहमंत्रिपद द्या, असं मी वरिष्ठांना सांगायचो, पण…”, अजित पवारांचं वक्तव्य; आर. आर. पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
Woman hit a man at petrol pump accident viral video on social media
बिचाऱ्याची काय चूक? स्कूटी चालवताना थेट पेट्रोल पंपावरच धडकली अन्…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
Congress 1st candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 Declared in Marathi
Congress Candidate List 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावे.
  • करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात.
  • अर्ज करणाऱ्यांच्या नावाने घर नसावे.
  • अर्जदाराने या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा.
  • ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ईडब्ल्यूएस कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

भारतात पहिला कॉल कोणी कोणाला केला होता? एक मिनिट बोलण्यासाठी यायचा ‘इतका’ खर्च

पंतप्रधान आवास योजनेचे प्रकार

  1. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
  2. पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U)

पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बीपीएल कार्ड
  • बँक पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साइझ फोटो
  • रहिवासी दाखला

पुण्यात इतक्या पेठा असूनही ‘नवी पेठ’ची निर्मिती का करण्यात आली?

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतात. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी –

पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • वेबसाइटवर गेल्यावर होम पेज उघडेल.
  • तिथे असलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता या अर्जामध्ये मागितलेली माहिती अचूक भरा.
  • त्यानंतर तिथे सांगितलेली आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा.
  • यानंतर तुम्हाला फायनल सबमिट हा पर्याय दिसेल.
  • तुम्ही अर्ज नीट भरल्यावर फायनल सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.