EPF Pension Scheme : नोकरदार व्यक्तींसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु अनेकांना त्यांच्याशी निगडित मौल्यवान पेन्शन फायद्यांची माहिती नसते. EPF योजना कर्मचाऱ्यांना केवळ सेवानिवृत्ती निधी तयार करण्यास मदत करत नाही तर कर्मचारी पेन्शन योजना (EPS) द्वारे आजीवन पेन्शनदेखील प्रदान करते. हे निवृत्तीवेतन निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देते, ज्यांनी किमान १० वर्षे योगदान दिलेले आहे आणि ५८ वर्षे वयापर्यंत कार्यरत आहेत, त्यांना पात्रता दिली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पेन्शन व्यतिरिक्त, EPFO जीवन विमा आणि करबचत फायदेदेखील देते, ज्यामुळे संघटित क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी एक व्यापक समर्थन प्रणाली (support System) निर्माण होते. हे पेन्शन फायदे कसे कार्य करतात हे जाणून घेणे, पात्रता निकष आणि इतर आवश्यक तपशील महत्त्वाचे आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे मुख्य फायदे (Key Benefits of EPFO)
EPF ही एक अनिवार्य सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जिथे नियोक्ता (नोकरी देणारी संस्था) आणि कर्मचारी दोघेही कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% योगदान देतात. हा निधी कालांतराने जमा होतो, ज्याचे व्याज मिळते आणि कर्मचार्याने पाच वर्षे सतत सेवा पूर्ण केली असल्यास पैसे काढल्यावर तो करमुक्त असतो. EPF योगदानावरील वर्तमान व्याज दर सरकार दरवर्षी सुधारित करते, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी हा दर ८.२५% आहे.
हेही वाचा – आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद किंवा कायमस्वरुपी Delete कसं करायचं? ‘ही’ सोपी प्रक्रिया जाणून घ्या…
EPS ( कर्मचारी पेन्शन योजना/Employees’ Pension Scheme)
कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या मुख्य फायद्यांपैकी हा एक आहे. मुळात, नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग EPS मध्ये जातो. एकदा कर्मचारी निवृत्तीचे वय ५८ पर्यंत पोहोचल्यानंतर नियमित पेन्शन मिळकत सुनिश्चित करते. पेन्शनची रक्कम सरासरी पगार आणि सेवा वर्षांचा विचार करणाऱ्या सूत्रावर आधारित असते. कर्मचाऱ्यांनी किमान १० वर्षे योगदान दिले असल्यास ते पूर्ण पेन्शनसाठी पात्र आहेत.
EDLI (एम्प्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स / Employees’ Deposit Linked Insurance)
EDLI कोणत्याही अतिरिक्त योगदानाची आवश्यकता न ठेवता EPF सदस्यांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. नोकरीदरम्यान सदस्याचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विमा रक्कम मिळते, जी कर्मचाऱ्याच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या पगाराच्या आधारे सात लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे विमा संरक्षण सर्व EPF सदस्यांना आपोआप उपलब्ध होते, जे त्यांच्या अवलंबितांसाठी अत्यंत आवश्यक सुरक्षा प्रदान करते.
कर लाभ (Tax Benefits)
EPF योगदान आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरतात. याशिवाय पाच वर्षांच्या सतत सेवेनंतर काढल्यास मुदतपूर्तीची रक्कम करमुक्त असते, ज्यामुळे EPF हे कर-कार्यक्षम बचत साधन बनते.
विशिष्ट गरजांसाठी आंशिक पैसे काढणे (Partial Withdrawals for Specific Needs)
EPFO सदस्यांना उच्च शिक्षण, विवाह, गृहकर्जाची परतफेड आणि वैद्यकीय खर्च यांसारख्या विशिष्ट हेतूंसाठी आंशिक पैसे काढण्याची परवानगी देते. काही अटींनुसार हे पैसे काढण्याची परवानगी आहे.
हेही वाचा – IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
ईपीएफओ सदस्यत्वासाठी पात्रता (Eligibility for EPFO Membership)
एखाद्या कर्मचाऱ्याने २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थेमध्ये काम करणे आवश्यक आहे. अशा कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक दोघेही EPFO लाभांसाठी पात्र आहेत. EPFO मध्ये पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी नियोक्ते जबाबदार आहेत, त्याद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नियुक्त केला जाईल याची खात्री केली जाते. हे UAN कर्मचाऱ्यांसह त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये कायम राहतो, ज्यामुळे त्यांना त्यांचा EPF बॅलेन्स अनेक नोकऱ्यांमध्ये अखंडपणे हस्तांतरित (transfer) आणि व्यवस्थापित (manage ) करता येतो.
Bankbazaar.com चे CEO आदिल शेट्टी यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, “सेवानिवृत्ती बचत आणि पेन्शनपासून जीवन विमा आणि कर फायद्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करणे EPF कर्मचार्यांसाठी आवश्यक आहे. आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह आणि खाते सेवांमध्ये सुलभ डिजिटल प्रवेशासह EPFO एक सोयीस्कर आर्थिक साधन म्हणून विकसित झाले आहे.”
EPFO दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचे समर्थन करण्यासाठी तयार केलेले फायदे देते. हे खाते सक्रिय ठेवणे आणि दीर्घकालीन फायद्यांसाठी त्याद्वारे बचत करणे महत्त्वाचे आहे.