प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न असतं. मर्यादित पगार असणाऱ्या व्यक्तींचं तर हप्ते आणि घर खर्चातच आयुष्य निघून जातं. मग काहींचं स्वप्न स्वप्नच राहतं. पण, तुम्हाला माहितेय का? की कमी पगार असतानाही तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. त्यासाठी तुमचा बेसिक पगार २५ हजार असायला हवा. जर तुमचा बेसिक पगार २५ हजार असेल, तर निवृत्त होईपर्यंत तुमच्याकडे एक कोटी रूपये जमा झालेले असतील. पण, त्यासाठी योग्य नियोजन करावं लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याच्या बेसिक पगाराच्या १२ टक्के रक्कम प्रॉविडंट फंडामध्ये (पीएफ) जमा होते. तेवढाच सहभाग कर्मचाऱ्याचाही असतो. आणखी एक महत्वाचे, कर्मचाऱ्याच्या सहभागातील सर्व रक्कम पीएफमध्ये जमा होत नाही. त्यामधील ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनामध्ये (ईपीएस) जमा होते. ईपीएसमधील जास्तीत जास्त योगदान १,२५० रूपयांपेक्षा जास्त नसेल. याचाच अर्थ ज्याचा पगार २५,००० रूपयांपेक्षा आधिक आहे त्याच्या पगारातील १२५० रूपये ईपीएसमध्ये जमा होतील.

आता उदाहरणातून समजून घेऊयात की, कमी पगार असतानाही निवृत्त होईपर्यंत कसं कोट्यधीश होता येईल. समजा, सुरेशचा पगार ६० हजार रूपये आहे. एकूण पगाराच्या ४० टक्क्यांनुसार सुरेशचा बेसिक पगार २५००० रूपये असेल. सुरेशचं आणि कंपनीचं प्रतिमहिना पीएफमध्ये प्रत्येकी तीन हजारांचं योगदान असेल. सुरेशच्या सहभागातील ८.३३ टक्के रक्कम म्हणजेच १२५० रूपये ईपीएसमध्ये जमा होतील. तर उर्वरीत १७५० रूपये पीएफमध्ये जमा होतील. म्हणजेच प्रतिमहिना सुरेशच्या पीएफ खात्यात ४,७५० रूपये जमा होतील.

सुरेश २५ वर्षांनी निवृत्त होईल, असे गृहित धरूयात आणि प्रतिमहिना जमा होणाऱ्या ४,७५० रूपयांचं गणित समजून घेऊया. सध्या ईपीएफच्या जमा रक्कमेवर ८.५ टक्के व्याज सरकारने ठरवून दिलं आहे. २५ वर्ष सुरेशच्या पीएफमध्ये जमा होणाऱ्या ४,७५० रूपयांवर ८.५ टक्केंच व्याज दरानुसार २५ वर्षांनंतर पीएफमध्ये ५० लाख (वर्षाच्या व्याजदरानुसार) रूपये जमा होतील.

हे झाले पीएफमधून मिळणारे ५० लाख. आता उर्वरित ५० लाख जमवण्यासाठी एक नवी योजना करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानद्वारे गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी सुरेशला इक्विटी म्यूचुअल फंडामध्ये एसआयपीची सुरूवात करावी लागेल. वर्षाला १२ टक्के परतावा गृहित धरल्यास सुरेशला २५ वर्षे प्रतिमहिना २,६०० रूपये गुंतवावे लागतील. म्हणजेच सुरेश ज्यावेळी निवृत्त होईल त्यावेळी त्याला पीएफचे ५० लाख आणि सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानचे ५० लाख असे एकूण एक कोटी रूपये मिळतील. म्हणजेच योग्य गुंतवणूक नियोजन केल्यास सुरेशला २५ हजार रूपये बेसिक पगार असतानाही कोट्यधीश होता येईल.