EPFO Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ – EPFO) ही कर्मचाऱ्यांना गरजेनुसार त्यांच्या पीएफ (PF) खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. कर्मचारी हे पैसे घर खरेदी करण्यासाठी, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण इत्यादी महत्त्वाच्या कारणांसाठी काढू शकतात.

अलीकडेच ईपीएफओने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये थोडे फार बदल केले आहेत, जेणेकरून कर्मचार्‍यांना अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढता येतील. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीएफमधून पैसे काढण्याची मर्यादासुद्धा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा ५० हजारांहून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या कंपनीच्या परवानगीशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे? चला तर जाणून घेऊ या.

uddhav thackeray
Maharashtra Vidhan Sabha : ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पाहा सर्व ८३ शिलेदारांची नावं एकाच क्लिकवर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
5 Countries Indians Can Visit Under 1 Lakh
Trips Under 1 Lakh From India: एक लाखात तुम्ही फिरू शकता हे पाच देश; आता बजेटची चिंता सोडा! ‘ही’ यादी पाहा
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत
BJP on action mode organizational review today in Akola
विधानसभा निवडणूक : भाजप ‘ॲक्शन मोड’वर, अकोल्यात आज संघटनात्मक आढावा
Maharashtra vidhan sabha
उमेदवारी अर्जांसाठी अखेरचे दोन दिवस; महायुती, मविआतील घोळ मात्र अद्याप कायम
Jammu Kashmir Assembly Chaos
Chaos in J&K Assembly : जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले; कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान!
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे महत्त्वाचे आहे.

  • युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN): तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे.
  • बँक खात्याची माहिती : ज्या बँक खात्यात ईपीएफचे पैसे येतात, त्या बँक खात्याची आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे.
  • ओळख आणि पत्त्याचा पुरावा : तुमची ओळख आणि तुमच्या पत्त्याविषयी माहिती पुरवणारे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. (जसे की आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र).
  • Cancelled चेक : सोप्या पद्धतीने पीएफ खात्यातील पैशांचा व्यवहार करण्यासाठी आयएफएससी कोड (IFSC CODE) आणि खाते क्रमांक असलेला Cancelled चेक असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन क्लेम करून तुम्ही कंपनीच्या स्वाक्षरीशिवाय तुमच्या पीएफ रकमेतून पैसे काढू शकता. क्लेम प्रक्रिया झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), अपडेटेड KYC आणि UAN वर नोंदणीकृत मोबाइल नंबर तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. वरील गोष्टी असतील तर तुम्ही कंपनीच्या परवानगी किंवा स्वाक्षरीशिवाय ईपीएफओ खात्यातून पैसे काढू शकता.

हेही वाचा : Trips Under 1 Lakh From India: एक लाखात तुम्ही फिरू शकता हे पाच देश; आता बजेटची चिंता सोडा! ‘ही’ यादी पाहा

जाणून घ्या प्रकिया

  • EPFO मेंबर पोर्टल unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface ला भेट द्या
  • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, ‘Manage’ पर्याय निवडा आणि तुम्हाला ‘KYC’ पर्याय दिसेल, तो पर्याय निवडा. आधार, पॅन आणि बँक माहितीसह तुमची KYC माहिती योग्य आहे का ते तपासा.
  • “Online Services” पर्याय निवडा. तिथे तुम्हाला ड्रॉपडाउन मेनूमधून Claim (Form-31, 19, 10C and 10D) पर्याय दिसेल.
  • तुम्हाला ज्या क्लेमद्वारे पैसे काढायचे, तो क्लेम प्रकार निवडा.
  • तुमच्या बँक खात्याची आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • त्यानंतर माहिती तपासा आणि तुमच्या क्लेमवर सबमिट करा.
  • तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल. त्या प्रमाणपत्रामध्ये ईपीएफओद्वारे तुमची जी रक्कम हवी आहे ती बँक खात्यात जमा केली जाईल, असे लिहिलेले दिसून येईल
  • अटी व शर्तींसाठी ‘yes’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Proceed for Online Claim’ पर्याय निवडा.
  • ‘I Want To Apply For’ पर्याय निवडा.
  • विचारलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • क्लेम मंजूर करण्यात आल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येतील आणि त्यानंतर तुम्ही तुमचे पीएफचे पैसे काढू शकता.

Story img Loader