Country Having 13 Months In A Year : एका वर्षात किती महिने असतात, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर तुमचे स्वाभाविक उत्तर ‘१२ महिने’, असेच असेल. पण, तुम्हाला माहितीये का जगात असा एक देश आहे, जिथे वर्षाला १२ महिने नाही, तर चक्क १३ महिने असतात. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.
आफ्रिकेतील इथिओपिया या देशात एका वर्षात १३ महिने असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं का? आणि त्यामागील कारण काय? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

या कारणामुळे इथिओपियामध्ये असतात एका वर्षात १३ महिने

इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वांत मोठा व सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे; जो त्यांचे स्वत:चे कॅलेंडर ( इथिओपियन कॅलेंडर) वापरतो. हे लोक इतर देशांप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर करीत नाही. या कॅलेंडरमध्ये एका वर्षात १३ महिने असतात. येथील प्रत्येक महिना हा ३० दिवसांचा असतो. १३ वा महिना हा पाग्युमे (Pagume) नावाने ओळखला जातो. या तेराव्या महिन्यात पाच दिवस आणि लीप वर्षात सहा दिवस असतात. याच कारणाने हा देश जगाच्या तुलनेत सात वर्षे मागे आहे.

guru gochar in taurus Diwali 2024 | guru vakri 2024
दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
Congress Party National General Secretary Priyanka Gandhi is a candidate in the Lok Sabha by election
प्रियंका गांधी संसदेत; ही केवळ ‘घराणेशाही’?
What is Blue Zone
Blue Zone : ‘ब्लू झोन’ म्हणजे काय? जिथे लोक १०० वर्षे जगतात; जगात ही ठिकाणे कुठे आहेत, तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या!
182 percent increase in direct tax collection over a decade news
प्रत्यक्ष कर संकलनांत दशकभरात १८२ टक्क्यांची वाढ; कर महसूल १० वर्षांत वाढून १९.६० लाख कोटींवर
Saturn-Jupiter Retrograde
तब्बल ५०० वर्षानंतर दिवाळीच्या काळात शनी-गुरू होणार वक्री; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् बक्कळ पैसा
how much should a person both above and below 60 years old walk everyday
६० वर्षांवरील वा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीने नियमित किती चालले पाहिजे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन

हेही वाचा : महाराष्ट्रात पहिल्या निवडणुकीपासून कसं बदललं मतदारसंघांचं गणित? ही संख्या २८८ पर्यंत कशी पोहोचली?

या दिवशी साजरे करतात नवीन वर्ष

१३ महिने असल्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे नवीन वर्ष कधी साजरे करतात? तर हा देश दरवर्षी नवीन वर्ष ११ सप्टेंबरला साजरा करतात. हा देश आजही स्वत:च्या कॅलेंडरचा वापर करतो आणि त्यानुसार तेथील लोक सण साजरा करतात. पण, इथिओपियाचे काही लोक ग्रेगोरियन कॅलेंडरचासुद्धा वापर करतात.

हेही वाचा : रेशनकार्डधारकांनो ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा KYC अन्यथा धान्य मिळणं होईल बंद; कशी करायची केवायसी? घ्या जाणून

u

इथिओपिया देश

या देशाला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा एकमेव असा देश आहे की, जिथे युरोपियन लोकांनी सत्ता केली नाही. इथिओपियाला कॉफीचे शहर (Birthplace of Coffee) म्हणूनसुद्धा ओळखले जाते. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाचा जगण्याचा मार्ग वेगवेगळा असू शकतो, याचे उत्तम उदाहरण इथिओपिया हा देश आहे.