Diamond Crossing in Nagpur : भारताच्या विविध राज्यातील विविध शहरांतून आणि लहान मोठ्या गावांतून धावणाऱ्या भारतीय रेल्वेची अनेक वैशिष्ट्य आहेत. अत्यंत कमी खर्चात इच्छितस्थळी सुरक्षित पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे भारतीय रेल्वे. या भारतीय रेल्वेचं जाळं अत्यंत गुंतागुंतीचं आहे. हे रेल्वे जाळं गुंतागुंतीचं असलं तरीही हा प्रवास सुरक्षित मानला जातो. एक असंही रेल्वे स्थानक आहे, जिथे चारही बाजूने रेल्वे जाते. पण तरीही तिथे अपघात होत नाहीत. याच स्थानकाविषयी आपण जाणून घेऊयात. या क्रॉसिंगलाच डायमंड क्रॉसिंग असं नाव आहे.

भारतात प्रतिदिन जवळपास १३०० हून अधिक ट्रेन देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून धावत असतात. यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. एखाद्या विशेष दिवशी आणि सणावाराला रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे सुविधाही पुरवली जाते. कारण यानिमित्ताने देशभरातील प्रवासी अनेक ठिकाणी प्रवास करत असतात.

हेही वाचा >> Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे

डायमंड क्रॉसिंग हा एक विशेष प्रकारचा क्रॉसिंग आहे, जो केवळ विशेष परिस्थितीत तयार केला जातो. हा रेल्वे ट्रॅकच्या नेटवर्कमधील एक बिंदू आहे, जिथे रेल्वे ट्रॅक चारही दिशांनी ओलांडतात. बऱ्याचदा रेल्वे ट्रॅकमध्ये एकाच ओळीत ट्रॅक असतात आणि त्याच दिशेने एकमेकांना क्रॉस करतात. पण डायमंड क्रॉसिंगमध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉससारखे एकमेकांना छेदतात.

डायमंड क्रॉसिंगची वैशिष्ट्य काय?

नागपूर डायमंड क्रॉसिंग हे भारतातील अनोखे रेल्वे जंक्शन आहे जिथं सर्व दिशांनी ट्रेन येतात. हे देशातील एकमेव रेल्वे जंक्शन आहे. हे डायमंड क्रॉसिंग पूर्वेकडे कोलकत्ता, पश्चिमेकडे मुंबई, उत्तरेकडे दिल्ली आणि दक्षिणेकडे चेन्नईपर्यंत प्रमुख रेल्वे मार्गांना जोडते. डायमंड क्रॉसिंगमध्ये सुमारे चार रेल्वे ट्रॅक आहेत, जे एकमेकांना दोन बाय दोन ओलांडतात. ते हिऱ्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना डायमंड क्रॉसिंग म्हणतात.

हेही वाचा >> Tanks Shape for Liquids : पाणी, दूध किंवा इंधन वाहून नेणाऱ्या टँकर्सचा आकार वाहतुकीसाठी कसा उपयोगी पडतो?

नागपूर जंक्शन हे महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या आणि व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. हे क्रॉसिंग देशाच्या विविध भागांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसंच, चारही दिशांनी येणाऱ्या गाड्या सुरक्षित आणि सुरळीत चालाव्यात यासाठी याची काळजीपूर्वक रचना केलेली आहे. नागपूरच्या मोहन नगर, समृद्धी नगरमध्ये हे डायमंड क्रॉसिंग आहे. एकाच वेळी दोन गाड्यांना हा ट्रॅक ओलांडणे शक्य नाही. त्यामुळे चारही दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Story img Loader