– नारायण आपटे

पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे संदेश पाठवणे सोपे नव्हते. कबुतर हे संदेशवहनासाठी चांगले माध्यम मानले जाते. कबुतराला दिशा तसेच स्थानांचे नेमके ज्ञान असते. त्याला प्रशिक्षण दिल्यास ते विशिष्ट ठिकाणी जा-ये करून संदेशांची देवाणघेवाण करू शकते. विशेषत युद्धाच्या काळात अशा कामासाठी कबुतरांचा प्रभावी वापर केल्याची उदाहरणे आहेत. सांडणीस्वार किंवा घोडेस्वार यांच्याद्वारेही संदेशांची देवघेव चालत असे, पण हे साधन राजघराण्यातील वा धनिक लोकांपुरतेच मर्यादित होते. ‘मेघदूता’मधला विरही यक्ष मेघाच्या मार्फत आपल्या पत्नीला संदेश पाठवतो. त्यासाठी यक्ष त्याला जाण्याचा मार्गही तपशीलवार सांगतो. नल तसेच दमयंतीने आपल्या संदेशांची देवाणघेवाण हंसामार्फत केली होती.

Due to delayed promotions and lack of qualified officers 4 chairpersons handle 40 297 pending caste certificate cases in 36 districts
जात पडताळणीची ४० हजार प्रकरणे प्रलंबित, केवळ चारच जणांकडे ३६ जिल्ह्यांचा कार्यभार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
shahapur bag news in marathi
शहापुरात बारदानाचा तब्बल २५ लाखांचा अपहार, प्रतवारीकार विरुद्ध किन्हवली आणि शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…

पोस्टाची सेवा सुरू झाल्यावर दळणवळणाची सुविधा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी खुली झाली. भारतापुरते बोलायचे झाल्यास, इंग्रजांच्या काळात भारतात पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ डिपार्टमेंट या नावाने १ ऑक्टोबर १८५४ रोजी पोस्टाची सेवा सुरू झाली. अलीकडच्या काळात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘भारतीय डाक खाते’ कार्यरत आहे. या खात्यामार्फत भारतात पत्रांच्या वाटपाबरोबरच इतरही अनेक सुविधा पुरवल्या जातात. स्पध्रेच्या युगातही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवण्याबद्दल या खात्याचा लकिक आहे. पोस्टातर्फे पोस्टल आयुर्वमिा, मनीऑर्डर, स्पीड पोस्ट, बुक पोस्ट यांसारख्या सुविधा अतिशय किफायतशीर दरात व खात्रीलायकरीत्या पुरवल्या जातात. हल्ली पोस्टल बँकही सुरू करण्यात आली, ज्याद्वारे एटीएमचीही सोय झाली आहे. दळणवळणाच्या अत्याधुनिक तसेच जलद माध्यमांमुळे तारेची सुविधा मात्र अलीकडे बंद करण्यात आली.

आता आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की, वेगवेगळ्या भाषा, अपुरे पत्ते, दुबरेध अक्षर, गावांच्या नावांतील साधम्र्य यांसारखे अडथळे पार करून योग्य ठिकाणी पत्र पोहोचवण्याचे अशक्यप्राय काम पोस्ट खाते कशा पद्धतीने करत असेल? हे काम सोपे केले आहे. ‘पोस्टल इंडेक्स नंबर’ किंवा ‘पिन’ या प्रणालीने.

भारतीय पोस्ट खात्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक गावाला, तेथील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसला स्वतंत्र ओळख असवी, या कल्पनेतून ‘पिन’ची संकल्पना उदयाला आली. श्रीराम भिकाजी वेलणकर (२२ जून १९१५ ते १ एप्रिल १९९९) हे या संकल्पनेचे ‘जनक’ मानले जातात. दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव या पदावर कार्यरत असताना त्यांनी ही वैशिष्टय़पूर्ण योजना राबवली. वेलणकर हे संस्कृत तसेच पाली भाषांचे अभ्यासकही होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी. १५ ऑगस्ट १९७२ या दिवसापासून ‘पिन’ ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आली.

 ‘पिन’ कशासाठी?

भारत हा विशाल क्षेत्रफळ असणारा खंडप्राय देश. तेथे अनेक राज्ये, निरनिराळ्या भाषा. इतकेच नव्हे तर एकाच नावाची किंवा नावांत साम्य असणारी अनेक गावे. उदाहरणच द्यायचे झाले, तर औरंगाबाद या नावाचे शहर महाराष्ट्रातही आहे आणि बिहारमध्येही आहे. नुसत्या महाराष्ट्रात वडगाव या नावाची अनेक गावे आहेत. तसेच, पाटण आणि पटणा या नावांतही साम्य आहेच. अशा स्थितीत, नावांत साम्य असणाऱ्या गावांतील फरक ओळखून योग्य गावी पत्र पोहोचण्यासाठी ‘पिन’ अतिशय उपयुक्त ठरतो.

 ‘पिन’ म्हणजे नेमके काय?

‘पिन’ हा सहा अंकी क्रमांक असतो. तो निश्चित करण्यासाठी भारताचे एक ते आठ असे विभाग (Zones) पाडण्यात आले आहेत. सन्यदलांसाठी नऊ हा क्रमांक राखीव आहे. या सहा अंकी पिनमधील पहिला अंक विभाग (Zone), दुसरा अंक उपविभाग (Sub Zone) आणि तिसरा अंक सॉìटग जिल्हा दर्शवतो. शेवटचे तीन अंक पत्रांचा बटवडा करणारे पोस्ट ऑफिस (Delivery Post Office) सूचित करतात.

‘पिन’मधील पहिल्या अंकात कोणकोणते विभाग येतात, ते खालील तक्त्यात दाखवले आहे.

आता, पिनच्या पहिल्या दोन अंकांनी कोणकोणती राज्ये सूचित केली जातात ते खालील तक्त्यात दर्शवले आहे.

वरील तक्त्यात आपण पाहिले की, महाराष्ट्राच्या ‘पिन’मधील पहिले दोन अंक ४० ते ४४ आहेत. आता, ‘पिन’मधील पहिल्या तीन अंकांत महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे समाविष्ट होतात, हे पुढील तक्त्यात आपण पाहू.

आता एक उदाहरण बघू. सांगली मुख्य पोस्ट ऑफिसचा पिन ‘४१६४१६’ आहे. यातील पहिला ‘४’ हा अंक महाराष्ट्र विभाग, दुसरा ‘१’ हा अंक गोवा-पणजी हा उपविभाग, तिसरा ‘६’ हा अंक सॉìटग जिल्हा सांगली, तर ‘४१६’ हे पुढील तीन अंक सांगली मुख्य पोस्ट ऑफिस सूचित करतात.

 ‘पिन’चे विविध उपयोग:

योग्य त्या पत्त्यावर पत्र पोहोचण्यासाठी ‘पिन’चा उपयोग होतो, हे आपण पाहिलेच. माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात पोस्टाने पत्र किंवा मनीऑर्डर पाठवण्याचे प्रमाण तुलनेने कमीच झाले आहे. तरीही ‘पिन’ची उपयुक्तता काही कमी झालेली नाही. उलट नवीन तंत्रज्ञानातही ‘पिन’ अधिक उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे.

हल्ली सर्व बँकांचे धनादेश हे टकउफ प्रणालीचे असतात. प्रत्येक धनादेशावर या बँकेच्या विशिष्ट शाखेचा टकउफ उीि छापलेला असतो. तो नऊ अंकी असतो. त्याचे पहिले तीन अंक बँकेची ती शाखा कुठल्या जिल्ह्यात आहे, हे दर्शवणारे असतात. ते त्या जिल्ह्य़ाच्या ‘पिन’चेच पहिले तीन अंक असतात. म्हणजेच टकउफ पद्धतीच्या धनादेशांसाठी संकेतांक ठरवताना ‘पिन’चा वापर केला जातो.

सध्याचे युग ऑनलाइन खरेदीचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ऑनलाइन ऑर्डर देताना वस्तू ज्या गावी पोहोच करावयाची आहे त्या गावाचा ‘पिन’ द्यावा लागतो. त्या गावी वस्तू देण्याची सुविधा आहे की नाही, हे ‘पिन’नेच  निश्चित केले जाते.

म्हणजेच आता ‘पिन’ हा फक्त पोस्ट ऑफिसपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा उपयोग बँका व ऑनलाइन शॉिपग वेबसाइट्स यांनाही तितक्याच समर्थपणे होतो.

वैशिष्टय़े :

  • जगातील सर्वात मोठे पोस्टाचे जाळे भारतात आहे. १,५५,५३१ पोस्ट ऑफिसेस भारतभर पसरलेली असून, खेडय़ांत त्यांची संख्या १,३९,८८२ (सुमारे ९० टक्के) आहे. (आíथक वर्ष २०१८-१९ चा अहवाल)
  • भारतीय डाक विभागात चार लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
  • एक पोस्ट ऑफिस सरासरी आठ हजार ७७०जणांना सेवा पुरवते.
  • एक पोस्ट ऑफिस सुमारे २१.१४ चौ. कि.मी. क्षेत्राला सेवा पुरवते.
  • जगातील सर्वात उंचावर असणारे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशातील लाहूल व स्पिती जिल्ह्य़ात हिक्कीम येथे आहे. त्याचा पिन १७२ ११४ आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १५ हजार फूट आहे.
  • भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई येथील जीपीओ (जनरल पोस्ट ऑफिस) असून, तेथे १०० पेक्षा जास्त काउंटर्स आहेत. त्याचा पिन ४००००१ आहे.
  • जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्य़ातील दाल सरोवरामध्ये भारतातील एकमेव तरंगते पोस्ट ऑफिस आहे. ‘नेहरू पार्क तरंगते पोस्ट ऑफिस’ असे त्याचे नाव असून, त्याचा पिन १९० ००१ आहे. त्याचे उद्घाटन २०११ मध्ये झाले.
  • सर्व स्त्री कर्मचारी असणारे पोस्ट ऑफिस शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे २०१३ साली सुरू झाले. त्याचा पिन ११० ००१ आहे.
  • भारतात एकूण १९,१०१ ‘पिन’ आहेत.
  • पोस्ट खात्यातर्फे दरवर्षी १५ ते २१ जानेवारी दरम्यान ‘पिन कोड सप्ताह’ साजरा केला जातो. या काळात लोकांमध्ये ‘पिन’ जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

‘पुलं’च्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘शेवटी आपण सगळे पत्त्यातल्या नावापुरते धनी. मजकुराचा मालक निराळाच!’

(सौजन्य: लोकप्रभा)

Story img Loader