Tallest Women On The Earth: चारचौघात आपण उठून दिसावं यासाठी लोक अनेक प्रकार करून पाहतात. यात तुमची उंची अधिक असेल तर जरा कमी मेहनत घ्यावी लागते, म्हणूनच अनेकदा उंची वाढवण्यासाठी खास प्रयत्न व व्यायामही केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का जगात एक अशी सुंदर तरुणी आहे जिला आता तिची अधिक उंचीच डोकेदुखी ठरत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात उंच महिला म्हणून नोंद असलेली रूमेसा हिला आपल्या उंचीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुमेसा उंची ही एका गंभीर आजारामुळे वाढल्याचे सुद्धा समजत आहे. उंची वाढवणारा हा आजार कोणता व नेमका त्यामुळे काय त्रास होतो हे आता आपण जाणून घेऊयात.
उंची वाढवणारा आजार
रुमेसा हिला जन्मतःच विवर सिंड्रोमचे निदान झाले होते. हा आजार एक अनुवंशिक डिसऑर्डर आहे, ज्यामुळे आपली उंची वाढू शकते. या आजारामुळे उंची वाढूनही रुमेसाच्या हाडांना आवश्यक पोषण मिळू शकत नाही. यामुळे हाडे ठिसूळ होऊन तिला नीट उभे राहायला सुद्धा त्रास होतो. रुमेसाला कमी अंतरावर जाण्यासाठी सुद्धा वॉकरच्या मदतीने चालावे लागते.
हे ही वाचा<< नारळात पाणी कुठून येतं माहितेय का? देवाची करणी की ‘हे’ आहे खरं कारण
२०१४ मध्ये रुमेसाचा विश्वविक्रम
रूमेसाने २०१४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मान आपल्या नावे केला होता. यावेळेस तिची उंची ७ फूट ९ इंच होती. रुमेसा आज रोजच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करून आपले आयुष्य जगत आहे. याशिवाय रुमेसाच्या नावे अन्य तीन वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहेत. रुमेसाच्या नावे जगभरातील सर्वात लांब बोटं, सर्वात लांब हात व सर्वात मोठी पाठ असे तीन विश्वविक्रम सुद्धा आहेत. रुमेसा सांगते की माझ्या उंचीमुळे मला कधी शाळेतही जाता आले नाही व माझे पूर्ण शिक्षण हे घरातच झाले आहे, अत्यावश्यक काम असल्यासच ती घराबाहेर पडते .