Fake currency note: बनावट चलन हे प्रत्येक देशासमोर असलेले मोठे आर्थिक संकट आहे. बनावट नोटांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या फर्जी या वेब सिरीजमुळे बनावट चलन प्रकरणावर प्रकाश टाकला होता. यामार्फत हे प्रकरण किती गंभीर आहे याचा अंदाज लोकांना आला. खिश्यामध्ये असलेली नोट ही खरी आहे की खोटी हे ओळखण्यासाठी त्यावरील काही गोष्टी तपासता येतात. यावरुन तुमच्याकडे असलेली ठराविक रक्कमेची नोट बनावट नाही ना याची खात्री करुन घेऊ शकता.
वॉटरमार्क तपासा. (Watermark)
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोचा वॉटरमार्क असते, यावर प्रकाश पडल्यावर तो दिसू लागते. हा वॉटरमार्क नोटेच्या डाव्या बाजूला असतो.
सुरक्षा धागा तपासा. (Security thread)
आपल्या देशातील नोटांवर एक विशिष्ट सुरक्षा धागा असतो. यावर RBI असे लिहिलेले आहे. शिवाय नोटेचे मूल्यदेखील छापलेले आहे.
मुद्रण गुणवत्ता तपासा. (Printing quality)
खऱ्या भारतीय नोटा उच्च प्रतीच्या छपाई तंत्रामार्फत छापल्या जातात. यामध्ये काही तीक्ष्ण रेषा देखील पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी नसलेल्या नोटा या बनावट आहेत असे समजले जाते.
सी-थ्रू रजिस्टर तपासा. (See-through register)
सर्व भारतीय चलनी नोटांमध्ये एक सी-थ्रू रजिस्टर असते. हे नोटेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला छापलेल्या नोटेच्या मूल्याची प्रतिमा असते. यावर प्रकाश टाकल्यास ती प्रतिमा स्पष्टपणे दिसते.
आणखी वाचा – पीपीएफ की रिकरिंग डिपॉजिट, गुंतवणुकीसाठी कुठला पर्याय अधिक फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
नोटेवरील सूक्ष्म अक्षरे तपासा. (Micro-lettering)
भारताच्या चलनी नोटांमध्ये काही ठराविक सूक्ष्म अक्षरे पाहायला मिळतात. भिंगाच्या मदतीने ही अक्षरे ओळखता येतात. याची रचना तीक्ष्ण आणि अचूक स्वरुपात असतात. ही अक्षरे पूर्णपणे स्पष्ट असतात. नोटेवर ही अक्षरे अस्पष्ट स्वरुपात असल्यास ती नोट बनावट आहे असा तर्क लावला जातो.
नंबर तपासा. (Serial number)
प्रत्येक भारतीय नोटेवर अनुक्रमांक (Serial number) छापलेला असतो. नोटेच्या दोन्ही बाजूंना हा एकच नंबर पाहायला मिळतो. बाजूच्या पॅनलवर छापलेल्या क्रमांकाशी हा नंबर जुळत असतो.
आपण लहानपणापासून चलनी नोटांना स्पर्श करत आलो आहोत. त्या नोटांचा एक विशिष्ट स्पर्श असतो. या स्पर्शावरुनही नोट खरी आहे की खोटी याचा अंदाज लावता येतो. बनावट भारतीय नोटांचे चलन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तर्फ अनेक उपाययोजना केल्या जातात. भारतामध्ये बनावट नोटा बाळगणे हा फौजदारी गुन्हा आहे. तेव्हा जर तुम्हाला एखादी बनावट नोट सापडली, तर विलंब न करता आरबीआय अधिकारी किंवा पोलीसांकडे जावे आणि ती नोट त्यांच्याकडे सुपूर्त करावी.