Finance Ministers of India : अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. निर्मला सीतारमण सादर करतील. अरुण जेटली यांच्या निधनानंतर निर्मला सीतारमण या अर्थमंत्री झाल्या. मोदी ३.० कालावधीतला निर्मला सीतारमण यांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. आपल्या देशाला अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या नेत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. सध्या निर्मला सीतारमण आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. १९४७ ला जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं तेव्हापासूनचे अर्थमंत्री कोण होते आपण जाणून घेऊ.
आत्ता देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
निर्मला सीतारमण या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. ३१ मे २०१९ या दिवशी त्यांची अर्थमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मोदी २.० मधल्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २०१९ ते २०२४ या कार्यकाळात त्यांनी सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. ज्यामध्ये २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे. आता त्या पुन्हा देशाच्या अर्थमंत्री झाल्या आहेत. १ फेब्रुवारीला त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
मनमनोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द चर्चेत
आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द चर्चेत राहिली. २६ डिसेंबर २०२४ त्यांचं निधन झालं. १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव असताना मनमोहन सिंग हे देशाचे केंद्रीय अर्थमंत्री होते. आपण जाणून घेऊ आत्तापर्यंत किती नेत्यांनी देशाचं अर्थमंत्री हे पद भुषवलं आहे आणि कुणाचा कार्यकाळ किती होता?
देशात १९४७ पासून आत्तापर्यंत कुणी भुषवलं आहे केंद्रीय अर्थमंत्री हे पद?
अ. क्रमांक | नेत्याचे नाव | कार्यकाळ | पक्ष |
१) | आर. के. षण्मुखम चेट्टी | १५ ऑगस्ट १९४७ ते १७ ऑगस्ट १९४८ | काँग्रेस |
२) | जॉन मथाई | २२ सप्टेंबर १९४८ ते २६ जानेवारी १९५० /२६ जानेवारी १९५० ते ६ मे १९५०/६ मे १९५० ते १ जून १९५० | काँग्रेस |
३) | सी.डी. देशमुख | १ जून १९५० ते १३ मे १९५२/ १३ मे १९५२ ते १ ऑगस्ट १९५६ | काँग्रेस |
४) | जवाहरलाल नेहरु | १ ऑगस्ट १९५६ ते ३० ऑगस्ट १९५६ | काँग्रेस |
५) | टी. टी. कृष्णाम्मचारी | ३० ऑगस्ट १९५६ ते १७ एप्रिल १९५७/१७ एप्रिल १९५७ ते १४ फेब्रुवारी १९५८ | काँग्रेस |
६) | जवाहरलाल नेहरु | १४ फेब्रुवारी १९५८ ते २२ मार्च १९५८ | काँग्रेस |
७) | मोरारजी देसाई | २२ मार्च १९५८ ते १० ते एप्रिल १९६२/ १० एप्रिल १९६२ ते ३१ ऑगस्ट १९६३ | काँग्रेस |
८) | टी. टी. कृष्णाम्मचारी | ३१ ऑगस्ट १९६३ ते ३१ डिसेंबर १९६५ | काँग्रेस |
९) | सचिंद्रा चौधरी | १ जानेवारी १९६४ ते ११ जानेवारी १९६६/ ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६/ २४ जानेवारी १९६६ ते १३ मार्च १९६७ | काँग्रेस |
१०) | मोरारजी देसाई | १३ मार्च १९६७ ते १६ जुलै १९६९ | काँग्रेस |
११) | इंदिरा गांधी | १६ जुलै १९६९ ते २२ जून १९७० | काँग्रेस |
१२) | यशवंतराव चव्हाण | २२ जून १९७० ते १८ मार्च १९७१ / १८ मार्च १९७१ ते १० ऑक्टोबर १९७४ | काँग्रेस |
१३) | चिदंबरम सुब्रमण्यम | १० ऑक्टोबर १९७४ ते २४ मार्च १९७७ | काँग्रेस |
१४) | हरिभाई एम पटेल | २४ मार्च १९७७ ते २४ जानेवारी १९७९ | जनता पार्टी |
१५) | चरण सिंग | २४ जानेवारी १९७९ ते १६ जुलै १९७९ | जनता पार्टी |
१६) | हेमवती बहुगुणा | २८ जुलै १९७९ ते १९ ऑक्टोबर १९७९ | जनता पार्टी सेक्युलर |
१७) | आर वेंकटरमण | १४ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८२ | काँग्रेस |
१८) | प्रणव मुखर्जी | १५ जानेवारी १९८२ ते ३१ ऑक्टोबर १९८४ | काँग्रेस |
१९) | व्ही. पी. सिंग | ३१ डिसेंबर १९८४ ते १४ जानेवारी १९८५/ १४ जानेवारी १९८५ ते ३० मार्च १९८५/ ३० मार्च १९८५ ते २५ सप्टेंबर १९८५/ २५ मार्च १९८५ ते २४ सप्टेंबर १९८७ | काँग्रेस |
२०) | राजीव गांधी | २४ जानेवारी १९८७ ते २५ जुलै १९८७ | काँग्रेस |
२१) | एन. डी. तिवारी | २५ जुलै १९८७ ते २५ जून १९८८ | काँग्रेस |
२२) | शंकरराव चव्हाण | २५ जून १९८८ ते २ डिसेंबर १९८९ | काँग्रेस |
२३) | मधू दंडवते | ५ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० | जनता दल |
२४) | यशवंत सिन्हा | २१ नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ | समाजवादी जनता पार्टी |
२५) | मनमोहन सिंग | २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ | काँग्रेस |
२६) | जसवंत सिंग | १६ मे १९९६ ते १ जून १९९६ | भाजपा |
२७) | पी. चिदंबरम | १ जून १९९६ ते १९ मार्च १९९७ | तमिळ महिला काँग्रेस</td> |
२८) | इंद्रकुमार गुजराल | १९ मार्च १९९७ ते २१ एप्रिल १९९७ | जनता दल |
२९) | पी. चिदंबरम | १ मे १९९७ ते १९ मार्च १९९८ | तामिळ महिला काँग्रेस |
३०) | यशवंत सिन्हा | १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ /१३ ऑक्टोबर १९९९ ते १ जुलै २००२ | भाजपा/एनडीए |
३१) | जसवंत सिंग | १ जुलै २००२ ते २२ मे २००४ | भाजपा/एनडीए |
३२) | पी. चिदंबरम | २३ मे २००४ ते ३० नोव्हेंबर २००८ | काँग्रेस |
३३) | मनमोहन सिंग | ३० नोव्हेंबर २००८ ते २४ जानेवारी २००९ | काँग्रेस |
३४) | प्रणव मुखर्जी | २४ जानेवारी २००९ ते २२ मे २००९/ २३ मे २००९ ते २६ जून २०१२ | काँग्रेस |
३५) | मनमोहन सिंग | २६ जून २०१२ ते ३१ जुलै २०१२ | काँग्रेस |
३६) | पी. चिदंबरम | ३१ जुलै २०१२ ते २६ मे २०१४ | काँग्रेस |
३७) | अरुण जेटली | २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ | भाजपा |
३८) | निर्मला सीतारमण | ३१ मे २०१९ ते आजपर्यंत | भाजपा |
आजवर देशाचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून ३८ नेत्यांनी कार्यभार सांभाळला आहे. तर अर्थमंत्री हे पद मिळवून तो कार्यकाळ पूर्ण करणारे नेते म्हणजे मनमोहन सिंग, अरुण जेटली आणि निर्मला सीतारामण हे तीन नेते ठरले आहेत.