कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकाचा एक लाख रूपयांपासूनच्या पुढील व्यवहारासाठी पॅनकार्ड सत्कीचे करण्यात आले आहे. महत्वाचं असणारं हे पॅनकार्ड हरवलं, तर अनेक अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल. त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसे काढाल ड्युप्लिकेट पॅनकार्ड –

https://www.tin-nsdl.com/ या संकेतस्थळावर जा

होमपेजवर Reprint of हा पर्याय निवडा

Reprint of हा पर्याय न मिळाल्यास Services’आणि ‘PAN’ हे पर्याय निवडा आणि स्क्रोल करून ‘Reprint of PAN Card’ हा पर्याय सिलेक्ट करा

– पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख ही माहिती भरा.

– पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी खालील बॉक्समध्ये सिलेक्ट करा.

– कॅप्चा कोड एन्टर करून सबमिट करा.

– तुमची पर्सनल माहिती कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.

– ओटीपी येण्यासाठी तुमचा ईमेल, मोबाईल क्रमांकवर पर्याय निवडा आणि Generate OTP वर क्लिक करा.

– ओटीपी सबमिट करा

– ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाईल. पेमेंटसाठी ‘Pay Confirm’वर क्लिक करा.

– आता पेमेंट करा

– पेमेंट भरल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येईल. याच मेसेजमध्ये अॅक्नॉलेजमेंट क्रमांकदेखील असेल. यातच ई-पॅन डाउनलोड करण्याची लिंकही असेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find out how you can apply for a duplicate pan card nck