भारतीय रेल्वे हे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेला देशातील लाइफ लाइनही म्हटलं जातं. ट्रेनमध्ये प्रवास करणे अत्यंत सुरक्षित आणि स्वस्त आहे. त्यामुळे यामध्ये हजारो आणि कोट्यवधी लोक प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशीही रेल्वे स्थानके आहेत जिथून तुम्ही थेट परदेशात जाऊ शकता.
भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकांवरुन तुम्ही थेट दुसऱ्या देशात जाऊ शकता
१.पेट्रापोल रेल्वे स्टेशन (Petrapole Railway Station)
हे रेल्वे स्टेशन भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आहे. तुम्ही या स्टेशनवरुन बांगलादेशात प्रवेश करू शकता.
२. हल्दीबारी रेल्वे स्टेशन (Haldibari Railway Station)
हल्दीबारी रेल्वे स्थानक बांगलादेश सीमेपासून फक्त ४.५ किमी अंतरावर आहे. हे पश्चिम बंगालमधील न्यू जलपाई गुडी रेल्वे स्थानकापासून वेगळे स्टेशन आहे. तुम्ही या स्टेशनवरुन बांगलादेशात जाऊ शकता.
(हे ही वाचा : ब्लेडच्या मध्यभागी मोकळी जागा का असते? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण… )
३. सिंघाबाद रेल्वे स्टेशन (Singhabad Railway Station)
हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आहे. बांग्लादेशच्या अगदी जवळ सिंहाबाद हे रेल्वे स्थानक आहे. येथून बांगलादेशला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. येथे उतरुनही पायी चालत बांगलादेशात जाता येते.
४. जयनगर रेल्वे स्टेशन (Jaynagar Railway Station)
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात हे रेल्वे स्टेशन भारत-नेपाळ सीमेजवळ आहे. विशेष म्हणजे, हे स्टेशन शेजारील देशापासून अवघ्या ४ किमी अंतरावर असून जनकपूरच्या कुर्था स्टेशनद्वारे नेपाळशी जोडले गेले आहे. तुम्ही या रेल्वे स्थानकावर गेला तर तुम्ही सहज नेपाळला जाऊ शकता.
५. राधिकापूर रेल्वे स्टेशन (Radhikapur Railway Station)
हे झिरो पॉइंट रेल्वे स्टेशन म्हणूनही ओळखले जाते. आसाम आणि बिहारमधून बांगलादेशात माल नेण्यासाठी या सीमावर्ती रेल्वे स्थानकाचा वापर केला जातो. राधिकापूर रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात आहे. येथून ट्रेन बांगलादेशला जाते.