Which Countries have Banned TIk Tok App and Why : भारतात TikTok या अॅपवरच्या बंदीला २०२५ मध्ये पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित जोखमीचा हवाला देऊन हे App बंद करण्यात आलं आहे. ही बंदी अजूनही कायम आहे. इतक्या दीर्घकाळ TikTok वरची बंदी भारताने कायम ठेवली आहे. मात्र या शॉर्ट फॉर्मेट व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारा भारत हा एकमेव देश नाही. तर इतरही देश आहेत. ते देश कुठले? त्यांनी ही बंदी का घातली हे आपण जाणून घेणार आहोत.
भारतात TikTok वर बंदी का घालण्यात आली आहे?
राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देऊन भारताने TikTok या अॅपवर २०२० मध्ये बंदी घातली. डेटा गोपनीयतेचा भंग करणाऱ्या चिनी अॅप्सवर मोदी सरकारने कारवाईची कुऱ्हाड चालवली होती. त्यात टिकटॉकही होतं. ByteDanceची मालकी असलेल्या टिकटॉकवर बंदी घालण्यात आली कारण देशाचे सुरक्षा नियम आणि अटी तसंच या अॅपच्या अटी जुळत नव्हत्या. टिकटॉक हे अॅप चीन आणि हाँगकाँगचं अॅप आहे. टिकटॉकवर तीन सेकंदांपासून ६० मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ तयार करण्याची सुविधा आहे. जून २०२० मध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. भारतातील अब्ज वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरुन तो डार्क वेब किंवा भारताबाहेरील सर्व्हरवर संग्रहित करण्याच्या तंत्रज्ञानाविरोधात या अॅपवर बंदी घालण्याचं पाऊल २०२० मध्ये उचलण्यात आलं.
अमेरिकेतही TikTok वर बंदी
अमेरिकेतही टिकटॉक या अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यावेळीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते. भारताप्रमाणेच लाखो अमेरिकन लोकांचा डेटा चीनकडे जाऊ नये याच प्रमुख कारणासाठी हे अॅप बंद करण्यात आलं. मात्र ही बंदी पूर्णपणे लागू करण्यात आली नाही. तसंच नंतर या प्रकरणी अमेरिकेत काही आव्हानं निर्माण झाली.
२०१८ मध्ये इंडोनेशियानेही TikTok वर घातली बंदी
२०१८ मध्ये इंडोनेशियाने टिकटॉकवर बंदी घातली होती. ही बंदी तात्पुरत्या स्वरुपाची होती. पोर्नोग्राफी, अयोग्य वर्तन, प्रौढ सामग्री या सगळ्या गोष्टी यामध्ये होत्या असा आरोप करण्यात आला होता. नंतर टिकटॉकने नियम कठोर कऱण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.
पाकिस्ताननेही टिकटॉकवर बंदी घातली होती
२०१९ मध्ये पाकिस्तानने टिकटॉकवर बंदी घातली. अश्लील कंटेंट पोस्ट केल्याचं कारण देत ही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर TikTok ने नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ही बंदी पाकिस्तानने मागे घेतली. या अॅपवर पाकिस्तानमध्ये अद्यापही निर्बंध लादण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्व राष्ट्रे
ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्व राष्ट्रांनी सुरक्षेचं कारण देत TikTok वर बंदी घातली. ही बंदी पूर्णपणे नसली तरीही या संदर्भातले नियम कठोर करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे बंदी काही प्रमाणात उठवली आहे. मात्र निर्बंध कायम आहेत.