Keep Your Aadhaar Details Safe : आधारचा गैरवापर होऊ नये यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) शुक्रवारी काही नियम आणि एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. पॅन किंवा पासपोर्ट वापरताना आधारची माहिती शेअर करताना सतर्कता बाळगण्याचा सल्ला यूआयडीएआयने दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आधार हा रहिवाशांचा डिजिटल आयडी आहे. देशभरातील रहिवाशांसाठी तो ऑनलाइन आणि ऑफलाइन ओळख पडताळणीचा एक स्त्रोत म्हणून काम करतो. आधार वापरताना त्याच गैरवापर होऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
(कुणालाही दिसणार नाही हा Folder, खाजगी फाइल्स ठेवण्यासाठी उत्तम, ‘असे’ तयार करा)
१) व्हीआयडी जनरेट करणे
तुम्ही आधार तपशील शेअर करू इच्छित नसल्यास, यूआयडीएआयद्वारे व्हर्च्युअल आयडेंटिफायर (VID) तयार करू शकता. तुम्ही हे यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा माय आधार संकेतस्थळावर जाऊन करू शकता आणि आधार क्रमांकाच्या जागी ते प्रमाणीकरणासाठी वापरू शकता. कॅलेंडर दिवस संपल्यानंतर हा व्हीआयडी बदलला जाऊ शकतो.
२) आधार लॉक करणे
तुम्ही एका विशिष्ट कालावधीत आधार आणि बायोमेट्रिक्स वापरणार नाही, हे आधीच ठरवले असेल तर ते लॉक करू शकता. पुन्हा वापरात आल्यावर ते सोयीस्करपणे आणि त्वरित अनलॉक केले जाऊ शकते.
(Laptop वायफायशी कनेक्ट होत नाही? कारणांसह जाणून घ्या उपाय)
३) आधार आणि त्याच्या प्रतिकडे दुर्लक्ष करू नका
आधार लेटर किंवा पीव्हीसी (पॉलिव्हीनील क्लोराइड) कार्ड किंवा त्याच्या कॉपीकडे दुर्लक्ष करू नका. सार्वजनिक डोमेनमध्ये, विशेषत: सोशल मीडिया आणि इतर सार्वजनिक प्लाटफॉर्मवर आधार तपशील उघडपणे शेअर करू नका. आधार धारकांनी त्यांचा ओटीपी कोणत्याही अनधिकृत घटकाकडे उघड करू नये आणि एम आधार पीन कोणाशीही शेअर करू नये.
४) ऑथेंटिकेशन हिस्ट्री तपासा
तुम्ही यूआयडीएआय संकेतस्थळ किंवा एम आधार अॅपवर गेल्या सहा महिन्यांची हिस्ट्री तपासू शकता. बनावटी तपासण्यासाठी यूआयडीएआय ईमेलद्वारे प्रत्येक प्रमाणीकरणाबद्दल सूचित करते. त्यामुळे आधारशी ईमेल अॅड्रेस लिंक केल्याने प्रत्येक वेळी आधार क्रमांक ऑथेंटिकेट केल्यावर त्याची माहिती युजरला मिळेल हे सुनिश्चित होईल.
(तुम्ही ऑनलाइन आहात हे कुणालाही कळणार नाही, ‘असे’ लपवा Whatsapp Online Status)
५) हेल्पलाइन क्रमांक
आधारचा अनधिकृत वापर केल्याचा संशय असल्यास किंवा इतर कोणत्याही प्रश्नासाठी यूआयडीएआयची टोल फ्री हेल्पलाइन १९४७ वर संपर्क साधू शकता. ही हेल्पलाइन २७ तास उपलब्ध असते किंवा help@uidai.gov.in संकेतस्थळावर ईमेल करू शकता.