ज्वालामुखी हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे, जे अनेकदा निसर्गाच्या प्रकोपाचे साक्षीदार असते. अस्थिर भूभाग (unstable landscape), उष्ण तापमान व विषारी वायूंचे उत्सर्जन यामुळे हे क्षेत्र जितके अद्वितीय आहे, तितकेच ते विचित्रदेखील आहे.
जगाभरात या ज्वालामुखीच्या प्रदेशांमध्ये जगणारे काही प्राणी आहेत, जे येथील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतात आणि विकसित होतात. हे १० प्राणी कोणते ते जाणून घेऊ…
लँड इगुआना (Land Iguana)
गॅलापागोस महाकाय सरडे गॅलापागोस बेटांवर राहतात. ते तीव्र ज्वालामुखीच्या प्रदेशात वाढतात. ज्वालामुखींमधून निघणाऱ्या उष्ण खडकांवर बसून मिळणारी उष्णता ते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी वापरतात. ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार आहे हेदेखील ते सांगू शकतात! ते प्रामुख्याने कॅक्टस आणि बेटावरील इतर वनस्पती खातात.

लेसर फ्लेमिंगो (Lesser Flamingo)
लेसर फ्लेमिंगो लेक नॅट्रॉनसारख्या अत्यंत खारट तलावांमध्ये राहतात आणि अशा ठिकाणी वाढणारे सायनो बॅक्टेरिया खातात. त्याच्या अद्वितीय उत्क्रांतीमुळे ते सर्व पारंपरिक प्रजातींसाठी घातक असलेल्या खारटपणाच्या पातळीवर टिकून राहू शकतात.
जॅक्स पेंग्विन (Jackass Penguin)
जॅक्स पेंग्विन, ज्याला आफ्रिकन पेंग्विन म्हणूनही ओळखले जाते. ते ज्वालामुखी बेटांच्या किनाऱ्यावर राहतात. ते त्यांच्या सभोवतालच्या खडकांचा वापर घरटे बांधण्यासाठी आणि संभाव्य भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करतात.
हवाईयन ब्लॅकफूट लिम्पेट (Hawaiian Blackfoot Limpet)
हवाईयन समुद्री गॅस्ट्रोपॉड, जो फक्त हवाईच्या ज्वालामुखी बेटांवर आढळतो, तो पाण्याखाली स्वतःला एका जागी घट्ट धरून ठेवण्यासाठी त्याच्या शक्तिशाली पायांचा वापर करतो; जेणेकरून वाहून जाणार नाही. हा हुशार प्राणी भक्षकांपासून स्वतःचे रक्षण करतो आणि शेवाळ खाऊन जगतो
व्हॅम्पायर ग्राउंड फिंच (Vampire Ground Finch)
गॅलापागोस बेटांच्या अस्थिर भूप्रदेशात राहणारा हा लहान पक्षी आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी सीगल्सचे रक्त पिण्यासाठी उत्क्रांत झाला आहे. ज्वालामुखीमुळे अन्नटंचाई निर्माण झाल्यास तो असे करतो.
नेने (Nene)
नेने हा एक हवाईयन हंस आहे, जो हवाईच्या ज्वालामुखी बेटांच्या खडकाळ भूप्रदेशाशी जुळवून घेतो. तो स्थानिक वनस्पतींवर आपले जीवन जगतो आणि प्रदेशाच्या कठोर परिस्थितीत सहज जगतो.
पॅसिफिक स्लीपर शार्क (Pacific sleeper shark)
शार्कची ही प्रजाती खोल महासागरांमध्ये राहते, जिथे ज्वालामुखी सक्रिय असतात. पॅसिफिक स्लीपर शार्कने थंड आणि उच्च दाबाच्या वातावरणात वाढण्याची क्षमता त्याने विकसित केली आहे, ज्यामुळे ते पाण्याखालील ज्वालामुखी क्षेत्रांमध्ये राहण्यासाठी ते योग्य बनतात.
सॅलॅमँडर (Salamanders)
सॅलॅमँडरची ही प्रजाती त्यांच्या त्वचेचा वापर करून, ओलावा शोषून घेऊ शकते. त्यामुळे त्यांना उष्ण तापमान आणि मुबलक आर्द्रता असलेल्या भूऔष्णिक भागात राहण्याचा फायदा होतो.

व्होल्कॅनो रॅबिट (Volcano Rabbit)
सशाच्या या प्रजातीचे केस जाड असतात आणि ते उंचावरील ज्वालामुखी भागात राहतात. ते प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात मुबलक प्रमाणात आढळणारे गवत आणि पानांच्या वनस्पती खातात.
जायंट ट्यूब वर्म्स (Giant Tube Worms)
सागरी भूऔष्णिक ठिकाणी आढळणारी किड्यांची ही विकसित झालेली प्रजाती आहे आणि अशा ठिकाणी निर्माण होणाऱ्या अत्यंत बिकट परिस्थितीत आणि तापमानाशी ती जुळवून घेत आहे.