आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम देशांतर्गत किमतींवरदेखील होत आहे. २०२३ मध्ये तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग ॲण्ड ॲनालिसिस सेलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारत सातत्याने कच्च्या आयात तेलावर अवलंबून आहे. भारतात २०२२-२३ मध्ये आयात तेलाचे प्रमाण ८७.३ टक्के आहे, जे २०२१-२२ मध्ये ८५.५ टक्के होते. अशा परिस्थितीत भारतात पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इतर स्रोतांचा शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षभरात भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पण मुंबई, चेन्नई, कोलकातासह काही शहरांमध्ये पेट्रोलने १०० चा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत सध्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे १०६ .३१ रुपये आणि ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. इंधनात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. यात आता World of Statistics या ट्विटर अकाउंटच्या आकडेवारीनुसार, १६ मार्च रोजी भारतात पेट्रोलची किंमत ९७.०० रुपये प्रति लिटर होती. तर अमेरिकेत ७८.०९ रुपये इतकी होती. याशिवाय शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये ८१.३८ रुपये आणि चीनमध्ये ७८.०९ रुपये इतकी होती. अमेरिका आणि चीनमध्ये पेट्रोलची किंमत ही या आकडेवारीनुसार समान आहे.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री

‘या’ देशात सर्वात स्वस्त पेट्रोल

१) व्हेनेझुएलात पेट्रोल जगाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मिळते. येथे पेट्रोलची किंमत १ रुपये ६४ पैसे म्हणजेच ०.०२ अमेरिकन डॉलर प्रति लिटर आहे. त्यामुळे पाण्यापेक्षाही कमी किमतीला इथे पेट्रोल मिळते. ही किंमत भारताच्या तुलनेत ९९ पट कमी आहे.

२) यानंतर सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये कुवेत दुसऱ्या स्थानी आहे. कुवेतमध्ये २३ रुपये ०२ पैसे म्हणजे ०.२८ डॉलर प्रति लिटर किमतीला पेट्रोल मिळते.

३) सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीत इथिओपिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथिओपियामध्ये पेट्रोलची किंमत २८.१३ रुपये म्हणजे ०.२२ डॉलर प्रति लिटर आहे.

४) यापाठोपाठ इराणमध्ये एक लिटर पेट्रोल २९.५९ रुपये म्हणजेच ०. ३६ डॉलरला विकत घेतले जाते. नायजेरियामध्ये ४६.८६ रुपये म्हणजेच ०.५७ डॉलर, सौदी अरेबिया ५०.९७ म्हणजेच ०.६२ डॉलर, रशिया ५१.७९ रुपये म्हणजेच ०.६३ डॉलर इतकी आहे. याशिवाय इंडोनेशियामध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ५५.०८ रुपये म्हणजेच ०.६७ डॉलर, यूएईमध्ये ६४.९४ रुपये म्हणजेच ०.७९ डॉलर आणि अर्जेंटिनामध्ये ६५.७६ रुपये म्हणजेच ०.८ डॉलर इतका आहे.

‘या’ देशात सर्वात महाग पेट्रोल

१) World of Statistics ट्विटरच्या आकडेवारीनुसार, लेबनॉनमध्ये जगातील सर्वात महाग पेट्रोल मिळते. येथे पेट्रोलची किंमत ५०२. २६ पैसे म्हणजेच ६.११ अमेरिकन डॉलर प्रति लिटर आहे.

२) जगातील सर्वात महाग पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये हाँगकाँग दुसऱ्या स्थानी आहे. हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना २४३.३२ पैसे म्हणजे २.९६ अमेरिकन डॉलर मोजावे लागतात.

३) यापाठोपाठ सर्वात महाग पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या स्थानी सिंगापूरचा समावेश आहे. सिंगापूरमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी २२५.२४ रुपये म्हणजेच २.७४ अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतात.

४) आइसलॅण्डमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १९६ रुपये ४७ पैसे म्हणजेच २.३९ डॉलर प्रति लिटर आहे. यानंतर डेन्मार्कमध्ये १८९ रुपये ०७ पैसे म्हणजेच २.३ डॉलर, फ्रान्समध्ये १८० रुपये ८६ पैसे म्हणजेच २.२ डॉलर, इटलीमध्ये १७७ रुपये ५६ पैसे म्हणजेच २.१६ डॉलर, नेदरलॅण्ड्स १७७. ५६ रुपये म्हणजेच २.१५ डॉलर्स इतकी आहे.

५) यानंतर फिनलॅण्डमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १७६ रुपये ७४ पैसे म्हणजेच २.१५ डॉलर इतकी आहे. तर ग्रीसमध्ये १७५ रुपये ०९ पैसे म्हणजेच २.१३ डॉलर, नॉर्वेमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १७५ रुपये ०९ पैसे म्हणजेच २.१३ डॉलर, जर्मनीमध्ये १६६ रुपये ०५ पैसे म्हणजेच २.०२ डॉलर आहे.

यूके एक लिटर पेट्रोलची किंमत १५० रुपये ४३ पैसे म्हणजेच १.८३ डॉलर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक लिटर पेट्रोलचा दर १०४ रुपये ४० पैसे म्हणजेच १.२७ डॉलर आहे. तर जपान, साऊथ अफ्रिका, साउथ कोरियामध्ये पेट्रोलची प्रति लिटरची किंमत अनुक्रमे १०३ रुपये ५८ पैसे म्हणजेच १.२६ डॉलर, १०२ रुपये ७५ पैसे म्हणजेच १.२५ डॉलर आणि १०१ रुपये ९३ पैसे म्हणजेच १.२४ डॉलर इतकी आहे.

Story img Loader