Funny Indian Station Names: भारतीय रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की एका दिवसात लाखो लोकं रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यात अनेक रेल्वे स्थानके बांधण्यात आली आहेत. जेणेकरून कोणत्याही एका स्थानकावर गर्दी होणार नाही. जगभरात अनेक असे रेल्वे स्टेशन आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. आपल्या देशात छोटी-मोठी नावं असलेली असंख्य रेल्वे स्टेशन्स आहेत. पण त्यासोबत काही रेल्वे स्टेशनची नावे इतकी विचित्र आहेत की, त्यातल्या काहींची नावं वाचून आपल्याला हसू आवरणार नाही अशी नावं आहेत. चला तर पाहूया भारतातल्या रेल्वे स्थानकांची विचित्र नावे…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘ही’ आहेत भारतातील विचित्र नावांची रेल्वे स्थानके
१. बाप रेल्वे स्टेशन: बाप नावाचे हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. हे स्थानकं भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राअंतर्गत येते. मात्र, हे खूप लहान स्टेशन आहे.
२. बीबीनगर रेल्वे स्थानक: दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत विजयवाडा विभागाचे हे रेल्वे स्थानक तेलंगणामध्ये आहे. हे स्टेशन सध्या तेलंगणातील भुवानीनगर जिल्ह्यात आहे. मात्र, या रेल्वे स्थानकाच्या नावाचा कोणत्याही व्यक्तीच्या पत्नीशी म्हणजेच बीबीशी काहीही संबंध नाही.
(हे ही वाचा : भारतातील कोणत्या २ रेल्वे स्थानकांना नावं नाहीत माहितीये? वाचून तुम्हीही थक्क व्हाल )
३. साली रेल्वे स्टेशन: वडील आणि आजोबांच्या पश्चात साली नावाचे रेल्वे स्थानक. हे स्टेशन जोधपूर जिल्ह्यात आहे. हे स्थानक उत्तर-पश्चिम रेल्वेला जोडलेले आहे.
४. नाना रेल्वे स्थानक: राजस्थानमध्ये नाना नावाचे रेल्वे स्टेशन देखील आहे. हे रेल्वे स्टेशन राज्यातील सिरोही पिंडवाडा नावाच्या ठिकाणी आहे.
५. सूअर स्टेशन: आतापर्यंत तुम्ही सूअर हे प्राण्याचे नाव ऐकले असेल. मात्र या नावाचे रेल्वे स्टेशनही आहे. हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात येते. मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूर ही या स्थानकाजवळ असणाऱ्या मोठ्या स्थानकांची नावे आहेत.
६. कुत्ता रेल्वे स्टेशन: कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या कुर्गमधील या छोट्या स्टेशनला कुत्ता रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे.
७. बिल्ली रेल्वे स्टेशन: हे स्टेशन उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात आहे. येथे एका गावाचे नाव बिल्ली आहे. यामुळे या स्टेशनचे नाव बिल्ली पडले.
८.भैंसा रेल्वे स्टेशन: भैंसा रेल्वे स्टेशन तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात आहे. येथे एका गावाचे नाव भैंसा आहे. यामुळे या स्टेशनचे नाव हे पडले.
९. काला बकरा रेल्वे स्थानक: हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात आहे. ही जागा गुरबचन सिंह नावाच्या शिपायासाठी ओळखली जाते. ब्रिटिश राजवटीत गुरबचन सिंह यांना ब्रिटिशांनी सन्मानित केले होते.
१०. सहेली रेल्वे स्थानक: मध्य प्रदेशातील नागपूर विभागांतर्गत येणारे हे रेल्वे स्टेशन भोपाळ आणि इटारसी यांच्या जवळ आहे.
११. पनौती रेल्वे स्टेशन: उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात पनौती हे एक छोटेसे गाव आहे. या रेल्वे स्टेशनचे नावं वाचून तुम्हालाही हसू येईल.
(हे ही वाचा : भारतात फक्त ‘या’ ठिकाणी एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाची रेल्वे स्थानकं; महाराष्ट्रातील जागेचे नाव वाचून व्हाल थक्क)
१२. चिंचपोकळी रेल्वे स्टेशन : हे रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई परिसरात येते. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. ब्रिटिश काळापासून हे नाव प्रचलित आहे.
१३. टिटवाळा रेल्वे स्टेशन: हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्य मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे. कल्याण ते कसारा दरम्यानच्या मार्गावर हे स्थानक आहे. या स्थानकाचे नाव ऐकूनही लोकांना आश्चर्य वाटते.