सध्या भारतासह संपूर्ण जगभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. भारतातील जे लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. तेही मोठ्या दिमाखाने परदेशात गणेशोत्सव साजरा करत असतात. मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का? की जगातला एक असा देश आहे, ज्या देशाच्या चलनावर हिंदू देवता गणपतीचा फोटो आहे. विशेष म्हणजे हा देश मुस्लीम बहुसंख्य असून या देशाचं नाव ‘इंडोनेशिया’ आहे. या देशाच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे. इंडोनेशियाचे चलन भारतातील चलनासारखेच आहे. या देशातला व्यवहार हा रुपयांमध्येच होतो.
२० हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो
इंडोनेशियामधील २० हजार रुपयाच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. या क्लासरुममध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.यासोबतच नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर प्रचंड विचार करुन २० हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतर या नोटेवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला.
खरं तर, या नोटेवर जेव्हापासून गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली, असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल देश असून येथे सुमारे ८७.५ टक्के मुस्लीम समुदाय वास्तव्यास आहे. तर या देशात केवळ ३ टक्के हिंदू राहतात. असं असलं तरी गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान यांचं देव मानलं जातं. ६४ कलांचा अधिपती आणि विद्येची देवता म्हणून गणपतीला ओळखलं जातं. याच भावनेतून इंडोनेशियाने २० हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो छापण्याचा निर्णय घेतला आहे.