श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आषाढ अमावस्येनंतर यंदा ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत श्रावण महिना असणार आहे. आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. दीप अमावस्येला विशेषतः दिव्यांचे पूजन केले जाते. याशिवाय या दिवसाची आणखी एक ओळख म्हणजे ‘गटारी’ अमावस्या. पण मुळात गटारी हे नाव त्याच्या मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश होत पडलं आहे.
गटारी म्हणजे नेमकं काय? आणि यंदा गटारीची पार्टी कधी करू शकता? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच दीप अमावस्या का साजरी केली जाते? दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन का करावं? यामागील कारणे जाणून घेऊ या…
दीप अमावस्या कधी आणि का साजरी केली जाते?
दीप अमावस्या यंदा ४ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. आपल्या आयुष्याला तिमिरातून तेजाकडे नेणारी ज्ञानरुपी-आरोग्यरुपी शक्तीचे प्रतिक म्हणून दिव्यांची पुजा केली जाते. हिंदू धर्मातही दिव्यांना खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील संकट दूर व्हावे, अज्ञानाचा अंधार दूर व्हावा यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते.
हेही वाचा – दर खेपेस मुंबईची तुंबई का होते? मुंबईच्या भूरचनेचा पूरस्थितीशी संबंध काय? कोण आहे जबाबदार?
आषाढ अमावस्येला लहान मुलांचे औक्षण का करतात?
पूर्वीच्या वेळी संध्याकाळी लहान मुलांचे औक्षण देखील केले जात असते कारण लहान मुलं ही भविष्याचे प्रतिक आहे आणि हे भविष्य उज्वल असावं या हेतूने त्यांना ओवाळले जाते.
हेही वाचा – अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला ‘Grey Divorce’ नक्की काय आहे? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
गटारी हा शब्द नेमका कुठून आला?
गटारी हा मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश झाल्यानंतर पडलेले नाव आहे. तर मूळ शब्द होता गतहारी. गत म्हणजे मागे सोडलेला किंवा मागे सारलेला आणि हारी म्हणजे आहारी जाणे. हे दोन शब्द एकत्र येऊन गतहारी शब्द तयार झाला आणि कालांतराने बोली भाषेत त्याचा अपभ्रंश होत त्याचा गटारी अमावस्या असा उल्लेख होऊ लागला.
गतहारी अमावस्या म्हणजे नेमके काय?
आषाढी अमावस्येनंतर चार्तुमास सुरू होतो. या काळात मांसाहार, मासे कांदा लसून असे पदार्थ वर्ज्य केले जातात. याचे मागेही कारण आहे. पहिले कारण असे की, चार्तुमास हा माशांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे या काळात मासेमारी बंद असते. दुसरे कारण म्हणजे की, पावसाळा सुरू झाल्याने शेतीच्या कामांना सुरू होतात. पूर्वी या काळात जे पदार्थ वर्षभर उपलब्ध असायचे ते या काळात कमी प्रमाणात उपलब्ध असतात म्हणून काही प्रमाणात आहाराबाबत निर्बंध लादले जातात. तिसरे कारण म्हणजे की, पावसाळ्यात काही पदार्थ आपल्या शरीराला पचवणे जड जाते. या तिन्ही कारणांमुळे आपण आपल्याच आहारातील काही पदार्थ मागे सोडतो आणि चार्तुमासात वेगळा आहार स्वीकारतो. पण त्याआधी मांसाहारावर ताव मारता यावा म्हणून ही गतहारी अमावास्या साजरी केली जाते.