Most Expensive Home In Mumbai After Mukesh Ambani : भारतात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर-बंगल्यांचे विषय नेहमीच चर्चेत असतात. भारतात असेही काही उद्योगपती आहेत, ज्यांच्या घराच्या किंमतीत अनेक दिग्गज कलाकारांची घरे खरेदी केली जाऊ शकतात. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलीया घराविषयी सर्वांना महितच असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी यांच्या घराची किंमत जवळपास १२००० कोटी रुपये आहे. पण तुम्हाला माहित आहे का, अंबानी यांच्यानंतर कोणत्या व्यक्तीकडे सर्वात महागडं घर आहे? जर नसेल महित, तर जाणून घेऊयात ती व्यक्ती कोण आहे आणि मुंबईत कोणत्या ठिकाणी त्याचं घर आहे.
६ हजार कोटींच्या घरात राहतात ‘हे’ उद्योगपती
देशात जवळपास १६० पेक्षा जास्त कोट्याधीशांची घरे आहे. जगातील सर्वात मोठे सूटिंग फॅब्रिक निर्माता रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया एक असं नाव आहे, ज्यांच्याकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही. भारतात अनेक फॅब्रिक ब्रॅंड उपलब्ध असतील, परंतु आजही रेमंडच्या कपड्यांवर लोक जास्त विश्वास ठेवतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम सिंघानिया ज्या घरात राहतात, त्या घराची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये आहे.
कसं आहे गौतम सिंघानिया यांचं घर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचं लक्झरी रेसिडेन्स १६ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आलं आहे. या घरात ३० फ्लोअर आहेत. याशिवाय त्यांच्या घरात एक स्पा, हॅलिपॅड आणि दोन स्विमिंग पूल आहेत. द न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, त्यांच्या घरात एका खासगी म्यूझियमही आहे. यामध्ये जुन्या कपड्यांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे. गौतम सिंघानियांच्या घरात असलेले पाच फ्लोअर त्यांच्या कार कलेक्शनसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये लॅम्बॉरर्गिनी गॅलार्डो, एलपी ५७० सुपर लेगेरा, लोटस एलिस कन्वर्टिबल, निसान स्कायलाईन जीटीआर, होंडा एस २०००, फरारी ४५८ इटालिया आणि ऑडी क्यू ७ सह अन्य कारचा समावेश आहे.
‘जेके हाऊस’मध्ये राहतात गौतम सिंघानिया
९ सप्टेंबर १९६५ ला जन्म झालेल्या गौतम सिंघानिया यांची बिजनेस स्ट्रॅटेजी आणि व्हिजनमुळे आज रेमंड ग्रुपने भारत आणि विदेशात छाप टाकली असून मार्केट मजबूत केलं आहे. कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेले मालक गौतम सिंघानिया शाही जीवनशैलीत राहतात आणि मुंबईत ते जे के हाऊस नावाच्या बिल्डिंगचे मालक आहेत.