General Knowledge : असं म्हणतात की, निसर्ग हा देवाने दिलेली सुंदर देणगी आहे. या निसर्गाने आजवर माणसासाठी खूप काही केले. माणसाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. निसर्गातील सर्वात मोठा घटक म्हणजे झाडे. झाडे माणसाला ऑक्सिजनसह फळे आणि फुले देतात.
निसर्गाच्या नियमानुसार एका झाडावर एकाच प्रकारचे फळ येऊ शकते, पण तुम्ही कधी वाचलं की एका झाडावर अनेक प्रकारची फळे आली आहेत? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण खरं आहे.
जगात एक असं झाड आहे, ज्याला दोन तीन नव्हे तर तब्बल चाळीस प्रकारची फळे येतात. निसर्गाचा नियम मोडणाऱ्या या झाडाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
‘ट्री ऑफ 40’
न्यूयॉर्कच्या सेराक्यूज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजूअल आर्टचे प्रोफेसर सॅम वॉन ऐकेन यांनी हे अविश्वसनीय झाड तयार केले आहे. ग्राफ्टिंगच्या मदतीने त्यांनी एकाच झाडावर चाळीस प्रकारची फळे लावली आहेत. या झाडाला त्यांनी ‘ट्री ऑफ 40’ असे नाव दिले आहे. या झाडावर बोरं, चेरीसारखी चाळीस फळे आहेत.
हेही वाचा : बिस्किटांमध्ये छोटी छोटी छिद्रे का असतात? फक्त डिझाइनसाठी नाही तर यामागे आहे हे सर्वांत मोठे कारण
या झाडाची किंमत किती ?
प्रोफेसर वॉन यांचा हा रिसर्च २००८ पासून सुरू होता. तेव्हापासून वॉन झाड बनविण्याचा प्रयत्न करत होते. खूप मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. विशेष म्हणजे वॉन यांनी हे एकच झाड बनविले नाही, तर याच्या अनेक कॉपी बनवल्या आहेत.
आतापर्यंत वॉन यांनी या ‘ट्री ऑफ 40’ ची अनेक झाडे वस्तूसंग्रहालय, बागा आणि कला प्रदर्शनींमध्ये भेट म्हणून दिले आहे. चाळीस प्रकारची फळे येणाऱ्या या झाडाची किंमत १९ लाख रुपये आहे.