बिस्किटे हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. अनेक लोक चहाबरोबर बिस्किटे खाऊन दिवसाची सुरुवात करतात. बिस्किटांमध्येही अनेक प्रकार दिसून येतात; जसे की गोड बिस्किटे, खारे बिस्किटे किंवा क्रीम बिस्किटे इत्यादी. तुम्ही कधी निरीक्षण केले का की, काही बिस्किटांवर छोटी छोटी छिद्रे असतात. विशेषत: क्रीम बिस्किटांवर जाणीवपूर्वक छिद्रे केलेली असतात; पण ती का आणि कशासाठी? चला तर जाणून घेऊ या ….

यामागे डिझाइन नाही तर हे आहे कारण

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

१. अनेक लोकांचा असा समज आहे की, बिस्किटांवर छिद्रे ही डिझाइनसाठी केली जातात; पण हे खरे कारण नाही. बिस्किटांवर छिद्रे करणे हा बिस्किटांच्या उत्पादनाचाच एक भाग असतो. बिस्किटांवर करण्यात येणाऱ्या छिद्रांना ‘डॉकर्स’, असे म्हटले जाते.

हेही वाचा : इन्स्टाग्राम थ्रेड्स कसे सुरु कराल? App कसं वापरायचं? तुमचे थ्रेड्स कोणाला दिसणार? सगळी उत्तरे जाणून घ्या

२. जेव्हा आपण एखादी खोली बांधतो, तेव्हा व्हेंटिलेशनसाठी आपण खोलीला खिडक्या किंवा मोकळी जागा ठेवतो; ज्यामुळे बाहेरून आत हवा जाऊ शकेल. बिस्किटांचेही असेच असते. बिस्किटांवर छिद्र ठेवण्यामागील मुख्य कारण म्हणजे बेकिंगच्या म्हणजे बिस्किटे भाजण्याच्या वेळी छिद्रांतून हवा पडेल.

३. बिस्किटे ही मैदा, कणीक, मीठ व साखर यापासून बनवली जातात. या मिश्रणाला एका साच्यात पसरवून मशीनखाली ठेवले जाते आणि मशीनच्या मदतीने त्यावर छिद्रे केली जातात. जेव्हा ओव्हनमध्ये बिस्किटे भाजली जातात तेव्हा उष्णतेमुळे बिस्किटे गरम होतात. मग बिस्किटांतील ही उष्ण हवा वा उष्णता बाहेर पडावी यासाठी बिस्किटांवर छिद्रे केली जातात.

हेही वाचा : Pune News : पाठलाग करणाऱ्या व्यक्तीपासून तरुणीला वाचवले; जाणून घ्या तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचे नंबर, पुणे पोलिसांनी केले ट्विट

४. क्रीम बिस्किटे करतानाही गरम क्रीम वापरली जाते आणि त्यावर बिस्किटे ठेवली जातात. त्यामुळे क्रीममधून निघालेली वाफ बाहेर पडावी यासाठी क्रिम बिस्किटांवर छिद्रे करण्यात येतात. जर बिस्किटांवर ही छिद्रे नसतील, तर बिस्किटे नरम पडण्याची किंवा तुटण्याची शक्यता वाढते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)