ओके हा शब्द लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना परिचयाचा आहे. दिवसातून कित्येकदा ओके हा शब्द आपल्या तोंडी येतो. कधी समोरासमोर बोलताना, तर कधी फोनवर बोलताना, तर कधी चॅटवर बोलताना ओके हा शब्द आपण नेहमी वापरतो. पण तुम्हाला ओके (OK) शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का?
ओके शब्दाचा फुल फॉर्म
OK शब्द आपण एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवताना वापरतो, पण खूप कमी लोकांना OKचा फुल फॉर्मही असतो हे माहिती नसणार. मुळात OK हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
Oll Korrect किंवा Olla Kalla हे दोन ग्रीक शब्द आहेत, ज्यांचा अर्थ ‘सर्व ठीक आहे’ असा होतो. इंग्रजीमध्ये यासाठी All Correct हा मूळ शब्द आहे. ज्याचा शॉर्ट फॉर्म AC होतो. पण आपण मात्र OK (Oll Korrect) हा शब्द वापरतो.
(हे ही वाचा : ATM मधले AC केवळ ग्राहकांसाठी नसतात! खरं कारण जाणून तर तुम्ही डोके धराल! )
अनेक जण OK हा चुकीचा शब्द असल्याचे मानतात. त्यांना Okay हा शब्द योग्य वाटतो. विशेषत: चॅटच्या दुनियेत सहसा लोक OK या शब्दाचाच जास्त वापर करताना दिसतात.
मुळात OK हा शब्द इतका परिचयाचा असतानासुद्धा अनेक लोकांना कदाचित याचा फुल फॉर्म माहिती नसावा. असे अनेक शब्द आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात नियमित वापरतो, पण त्या शब्दांचा फुल फॉर्म आपल्याला माहिती नसतो.