Cooling With Lake Water: उन्हाळ्यात घर, ऑफिसमध्ये थंड राहण्यासाठी एअर कंडिशनर सर्रास वापरले जातात. अर्थात, ते घराच्या आतील वातावरण थंड करतात, परंतु ते पर्यावरणासाठी खूप धोकादायक आहेत. ते धोकादायक वायू उत्सर्जित करते, जे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून जिनिव्हा येथील इमारत थंड करण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबली जात आहे. येथे इमारती थंड करण्यासाठी वातानुकूलित करण्याऐवजी तलावातील पाण्याचा वापर केला जात आहे. होय, आणि यामुळे वीज वापर केवळ ८०% कमी होत नाही तर वातवरणाचे देखील नुकसान होत नाही.

तलावांमध्ये खोलवर थंड पाणी असते

स्विस कंपनी SIG युरोपातील सर्वात मोठ्या अल्पाइन सरोवरात ४५ मीटर खोलीतून पाणी उपसत आहे. या खोलीवर पाण्याचे तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस राहते. हे पाणी नंतर स्थानिक इमारतींमधील हीट एक्सचेंजर्समधून जाते, जे इमारतींची उष्णता शोषून घेतात आणि त्यांना थंड करतात. नंतर ते पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. एअर कंडिशनिंग सिस्टम दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करते. ही प्रक्रिया एअर कंडिशनिंगची गरज दूर करत आहे. ज्यामुळे ऊर्जेची बचतही होऊ शकते.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद

हेही वाचा : उन्हाच्या झळांपासून सुटका देणारा हा ‘देशी जुगाड’ पाहिलात का? अमिताभ बच्चनही झाले थक्क!

Eco Friendly Building
जिनिव्हा येथील इमारत थंड करण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबली जात आहे. unsplash\ CHUTTERSNAP

पर्यावरणालाही फायदा होतो

एवढेच नाही तर हिवाळ्यात या यंत्रणेत हिट पंप जोडून गरम पाण्याच्या यंत्रणेने इमारतींनाही उबदार ठेवले जाते. यामुळे कार्बन उत्सर्जनात ८०% घट होते. सध्या, या प्रणालीमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीसह ५० इमारतींचा समावेश आहे.

हेही वाचा – श्रीलंकेत विकसित होणार रामायणाच्या खुणा! प्रवाशांना भारतीय रुपये वापरण्याची दिली जाऊ शकते परवानगी

४०% उत्सर्जन इमारतींमधून होते

२०३५ पर्यंत, जिनिव्हामध्ये ३० किलोमीटर नवीन पाईप्स जोडण्याची योजना आहे. यामुळे CO2 उत्सर्जन दरवर्षी ७०,००० टन कमी होईल, जे ७,००० घरांच्या उत्सर्जनाच्या समतुल्य आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, जागतिक स्तरावर इमारतींचा वाटा सुमा ४० टक्के पर्यावरण आणि ऊर्जा उत्सर्जन आहे. समस्या सोडवण्यासाठी सर्वच क्षेत्रातून सहकार्य आवश्यक आहे.

२०१८ पर्यंत ही प्रणाली इतकी प्रभावी ठरली आहे की तेव्हापासून जिनिव्हा शहरात केंद्र आणि सात नगर पालिकांपर्यत वाढवला आहे. ५० इमारतींनी याचा लाभ घेतला आणि २०३५ पर्यंत ३५० पेक्षा अधिक इमारत सिस्टम जोडण्याची प्रयत्न करत आहेत.

Story img Loader