भारतात सोने खरेदीची मोठी क्रेझ पाहायला मिळते. यामुळे सोने खरेदीसाठी भारतात लोक खूप पैसा खर्च करतात. तर काहीजण सोने खरेदीकडे एक गुंतवणुक म्हणून पाहतात. पण तुम्ही कल्पना करा, जर कचऱ्याच्या बदल्यात तुम्हाला सोने मिळत असेल तर..यावेळी तुम्ही खूप कचरा द्याल आणि त्या बदल्यात सोने घ्याल ना.. पण खोटं वाटेल, भारतात असं एक गाव आहे जिथे प्लास्टिकचा कचरा दिल्यास सोने मिळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात प्लास्टिक द्या, सोनं घ्या ही योजना सुरु होताच तिथला सर्व कचरा दिसेनासा झाला आहे.
नेमकं हे गाव कुठे आहे?
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सदिवारा असे या गावाचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी या गावच्या सरपंच्यांनी प्लास्टिक प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. या गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांनी प्लास्टिक प्रदूषणमुक्त गाव करण्याच्या उद्देशानेही ही मोहीम सुरु केली आहे, व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. मात्र यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे.
महाराष्ट्रातील असं गाव जिथे सायरन वाजताच लोक फोन, टीव्ही, लॅपटॉप करतात बंद! यामागचे कारण जाणून घ्या
प्लास्टिक द्या, सोने घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच गनई यांनी ‘प्लास्टिक द्या, सोन घ्या’ नावाची एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत जो कोणी व्यक्ती २० क्विंटल प्लास्टिक कचरा देईल त्याला पंचायत सोन्याचे नाणे देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या मोहिमेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही ही मोहीम सुरु केल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या आपल्या गावात बक्षीसाच्या बदल्यात पॉलिथिन देण्याचा नारा त्यांनी सुरू केला होता, जो यशस्वी झाल्याचे सरपंच सांगतात. मी गावातील नदी-नाले स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता गावातील प्रत्येकाने आम्हाला स्वच्छता मदत करण्यास मदत केली आहे.