Google Employee Salary: गूगलमध्ये नोकरी मिळावी असं स्वप्न प्रत्येक इंजिनिअर उराशी घेऊन असतो. काहींना तर हेच एक ध्येय इंजिनिअरिंगचा चार वर्षांचा अभ्यास मन लावून करण्यासाठी प्रोत्साहन देत असतं. गूगलमध्ये काम करणे हे मान- सन्मानाचे जरी मानले जात असले तरी हा काही गूगलच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा एकमेव फायदा नाही. अलीकडेच लीक झालेल्या एका अहवालात गूगलच्या कर्मचाऱ्यांना पदानुसार मिळणाऱ्या पगाराची माहिती समोर आली आहे. गुगलने २०२२ मध्ये कर्मचार्‍यांच्या पगारासाठी सरासरी एकूण $279,802 (अंदाजे ₹ २.३ कोटी) खर्च केले असल्याचे समजत आहे. चला तर मग गुगलच्या कोणत्या पदावरील कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो हे जाणून घेऊया…

बिझनेस इनसाइडरद्वारे प्राप्त झालेल्या स्प्रेडशीटमध्ये विविध पदांसाठीचा पगार पाहता येत आहे. स्प्रेडशीट नुसार, २०२२ मध्ये 718,000 डॉलर (अंदाजे ₹6 कोटी) मूळ वेतनासह, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हे कंपनीत सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत टॉपला आहेत.

personal assistant Bhushan Gagrani nashik a person cheated unemployed people government job nashik
भूषण गगरानी यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगून बेरोजगारांची फसवणूक, शासकीय नोकरीचे आमिष
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
All about the Indian Forest Service
नोकरीची संधी
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
Income Tax
Income Tax : “वर्षाला ६० लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब, कारण ७० टक्के पगार तर…” तंत्रज्ञाची पोस्ट व्हायरल
US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
Mohandas Pai
“सीईओंना ५० कोटी रुपये पगार देता पण…”, इन्फोसिसचे माजी अधिकारी म्हणाले, “आयटी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर्सचे शोषण”
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डेटा केवळ यूएसमध्ये कार्यरत फुल- टाइम कर्मचार्‍यांशी संबंधित आहे आणि अल्फाबेटच्या इतर उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांचा पगार यामध्ये समावेश नाही. या व्यतिरिक्त, डेटा मर्यादित लोकांद्वारे उघड केलेल्या माहितीवर आधारित आहे, कारण सर्व कर्मचारी त्यांच्या इक्विटी आणि बोनसची माहिती शेअर करण्यास इच्छुक नव्हते.

गूगलच्या कर्मचाऱ्यांच्या पदानुसार पगाराचा आकडा

सॉफ्टवेअर इंजिनीअर₹6 कोटी
इंजिनिअरिंग मॅनेजर₹3.28 कोटी
एंटरप्राइझ डायरेक्ट सेल्स₹3.09 कोटी
लीगल कॉर्पोरेट वकील ₹2.62 कोटी
सेल्स स्ट्रॅटर्जी₹2.62 कोटी
UX डिझायनर₹2.58 कोटी
सरकारी व्यवहार आणि सार्वजनिक धोरण₹2.56 कोटी
संशोधन वैज्ञानिक₹2.53 कोटी
क्लाउड सेल्स₹2.47 कोटी
प्रोग्राम मॅनेजर₹2.46 कोटी

हे ही वाचा<< मुंबईत ‘इथे’ आहे जगातील सर्वात मोठी लिफ्ट; मुकेश अंबानींशी आहे खास संबंध, Video पाहून डोकंच धराल

दरम्यान, जर आपण MyLogIQ द्वारे संकलित केलेला 2022 डेटा पाहिला, तर वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, जगातील सर्वोच्च पगार देणाऱ्या कंपनीच्या यादीत मेटा ने USD 300,000 च्या सरासरी पगारासह दुसरे स्थान मिळवले आहे तर Google ची मूळ कंपनी Alphabet ने USD 280,000 सरासरी पगारासह तिसरे स्थान पटकावले आहे.

Story img Loader