सध्या लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. मोबाईलमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारी गोष्ट म्हणजे गुगल. हे सर्च इंजिन प्रत्येकासाठी गरज बनलं आहे. काहींसाठी तर गुगलशिवाय राहणं अशक्य आहे. काहीही झालं तरी ते लगेच फोनवर गुगल करायला लागतात. गुगलच्या वापरकर्त्यांची संख्या लाख-कोटींच्या घरामध्ये आहे. अल्फाबेट (Alphabet) या संस्थेपासून गुगलची सुरुवात झाली. रोजच्या वापरामधल्या या सर्च इंजिनचं खरं नाव खूप कमी लोकांना ठाऊक आहे. गुगल हे अल्फाबेटच्या सर्च इंजिनचे संक्षिप्त रुप आहे.
गुगलचा फुल फॉर्म काय आहे?
गुगल सर्च इंजिनचा वापर आपण दररोज करत असूनही बहुतांश लोकांना त्याच्या विस्तृत रुपाची (फुल फॉर्म) फारशी कल्पना नसल्याचे आढळते. गुगलचा फुल फॉर्म ‘Global Organization of Oriented Group Language of Earth’ हा आहे. या विस्तृत रुपाचा बोलताना वापर करणं कठीण असल्यामुळे गुगल हा शॉर्टफॉर्म प्रचलित झाला.
इंटरनेटलाही आहे विस्तृत व्याख्या
इंटरनेटच्या महाजाळामुळे लोक एकमेकांना जोडली गेली आहेत. त्यासाठी आंतरजाळ हा मराठी शब्द असला तरी बरेचसे लोक इंटरनेट याच शब्दाचा प्रकर्षाने वापर करतात. इंटरनेटचा फुल फॉर्म ‘Interconnected Network’ असा आहे. या दोन्ही शब्दांना एकत्र केल्याने इंटरनेट हा शब्द तयार झाला आणि त्याचा वापर वाढला.
संगणक (कंप्यूटर) शब्दाचा फुल फॉर्म माहितीये का?
कामासाठी, अभ्यासासाठी आपण दैनंदिनरित्या संगणकाचा वापर करतो. नेहमीच्या वापरात असलेल्या कंप्युटरचा फुल फॉर्म ‘Common Operating Machine Purposely used for Technological and Educational Research’ असा आहे.
मोबाईलचा फुल फॉर्म
करोना काळामध्ये मोबाईलचा वापर वाढला. टाळेबंदी असल्यामुळे लोकांना घरामध्ये बसावे लागते. परिणामी त्यांचा मोबाईल वापरण्याचा वेळ वाढला. मनोरंजन, शिक्षण ते , ऑफिसचं काम करण्यापर्यंत लोक मोबाईल वापरु लागले. सर्वांसाठी जीव की प्राण असलेल्या मोबाईलचा फुल फॉर्म ‘Modified Operation Byte Integration Limited Energy’ आहे.