जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक रवींद्रनाथ टागोर यांचे आज पुण्यस्मरण आहे. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथ टागोर यांचा स्मृतिदिन असतो. रवींद्रनाथ यांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी वडिलांसोबत कलकत्ता सोडले व भारतभ्रमण सुरू केले. भारतातील अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. याच काळात त्यांनी खगोलशास्त्र, विज्ञान, संस्कृत, इतिहास या विषयातले अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली. अनेक महान व्यक्तींची आत्मचरित्रे अभ्यासली. इतका दांडगा व्यासंग व वाचन असल्याने वयाच्या फक्त १६ व्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२७ डिसेंबर १९११ रोजी कोलकात्यात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले असताना ‘जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.

रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य

  • इ.स. १८७६ मध्ये रवीद्रनाथ यांची ‘वनफूल’ ‘ज्ञानाकुर’ ह्या पहिल्या कविता मासिकामध्ये प्रकाशित झाली.तसेच ‘साधना’,’भारती’ व ‘वंगदर्शन’ या मासिकांचे त्यांनी संपादन केले.
  • इ.स. १९०१ मध्ये कलकत्त्याजवळील बोलपूर येथे ‘शांतिनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली. मुलांना शाळेच्या इमारतीतील चार भिंतींच्या आत कोंडून त्यांना रटाळ पद्धतीने शिक्षण देण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात वागण्याची संधी देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुक्त विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
  • इ. स.१९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर हे इंग्लंडला गेले. गीतांजली या बंगाली कवितेचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले होते. श्रेष्ठ कवि डब्ल्यू. वी. यट्स यांना ही कविता इतकी आवडले की, त्यांनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि काव्यसंग्रहाची इंग्रजी प्रत प्रकाशित केली. त्यानंतर लवकरच ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहांची विविध परदेशी व भारतीय भाषांमध्ये भाषांतरे करण्यात आली. गीतांजलीमधील कवितांचा मुख्य विषय ईश्वरभक्ती असून अतिशय कोमल शब्दांत व अभिनय पद्धतीने रवींद्रनाथांनी ती व्यक्त केली.
  • विश्वभारतीने शिक्षण क्षेत्रात अनेक नव्या संकल्पना आणल्या आणि शिक्षण पद्धतीला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. इ. स. १९३० मध्ये म्हणजेच रवींद्रनाथ यांच्या वयाच्या ७० व्या वर्षी चित्रकला शिकण्याची इच्छा झाली. त्यांनी दहा वर्षात ३००० चित्रे काढली.

रवींद्रनाथ टागोर यांना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार

  • रवींद्रनाथ टागोर यांना कलकत्ता विद्यापीठाकडून ‘डी. लिट’ पदवी मिळाली.
  • इ. स. १९१३ मध्ये डॉ. आल्फ्रेड नोबेल फाऊंडेशन ने रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहास साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठकडून डॉक्टरेटची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली.
  • जण, गण, मन’ या राष्ट्रगीताचे निमित्त रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय.

 

 

 

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great poet literary philosopher and writer of the national anthem rabindranath tagore 80th death anniversary scsm