Why was the Great Wall of China built?: जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चीनची ग्रेट वॉल सुमारे २,५०० वर्षांपूर्वी बांधली गेली. ही भिंत बांधल्यापासून या भिंतीने काळाची कठोर परीक्षा सहन केली आहे. ग्रेट वॉल हा एक भव्य लष्करी संरक्षण प्रकल्प होता. या भिंतीचे काम अनेक वर्षे होत राहिले. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत बांधकाम होत राहिले. वाळवंटे, पर्वत, गवताळ प्रदेशांवर पसरलेली ही भिंत केवळ एक भिंत नाही तर शतकानुशतकांच्या इतिहासाची आणि महत्त्वाकांक्षेची ती साक्षीदार आहे. चीनच्या उत्तरेकडील सीमेवर या भिंतीचे काम चीनच्या विविध साम्राज्यांनी केले, आणि तिची एकत्रित लांबी २०,००० किलोमीटरहून अधिक अशी थक्क करणारी आहे. ही भिंत शेकडो वर्षे विविध चिनी नेत्यांनी आपल्या भूमींचे शेजारील साम्राज्यांपासून आणि नंतर उत्तरेकडील भटक्या आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधली होती. या भिंतीच्या पाठीमागे एक कथा आहे, जी नेहमी इतिहासाचा भाग म्हणून लक्षात ठेवली पाहिजे. ही भिंत सलग नव्हती, कारण वेगवेगळ्या साम्राज्ये असलेल्या वेई, झाओ, ची, यान, आणि झोंगशान यांनी आपल्या स्वतःच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी भिंतींचे भाग बांधले. भिंतीचे हे स्वतंत्र भाग सलग रचना तयार करत नसले तरी ते विस्तृत प्रदेश व्यापून होते. सर्वात प्राचीन भिंत दाबलेली माती आणि खडी वापरून बांधली गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
विकिपीडिया

अधिक वाचा: Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?

चीनचा पहिला सम्राट, चिन शी हुआंग यांनी इ.स.पूर्व २२१मध्ये सात राज्यांना एकत्र करून पहिले एकसंध चिनी साम्राज्य स्थापन केले. या एकतेचे प्रतीक म्हणून, सम्राटाने या सात राज्यांनी बांधलेल्या विद्यमान भिंतींना एकत्र जोडण्याचा निर्णय घेतला. ही भिंत सुरुवातीला मातीने (एक बांधकाम तंत्र) तयार केली गेली होती. अनेक सम्राट आले आणि गेले, प्रत्येकाने भिंत पुढे कशी बांधायची याबद्दल स्वतःचे विचार आणि दृष्टिकोन आणले. कालांतराने भिंत वाढवण्यात आली आणि काही ठिकाणी ती विटांनी बांधली गेली. इतरत्र, खडकातून मिळवलेल्या ग्रॅनाइट किंवा अगदी संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला. बांधकाम तंत्रातील प्रगतीमुळे भिंतीच्या बांधकामात अनेकदा सुधारणा करण्यात आल्या.

चीनची भिंत: विकिपीडिया

अधिक वाचा: 2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते? 

इ.स. १३६८ साली झू युआनझांग यांनी मिंग राजवंशाची स्थापना केली. हा राजवंश सिरॅमिक आणि चित्रकलेतील त्यांच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. या कालखंडात भिंतीवर टेहळणी बुरूज आणि प्लॅटफॉर्म जोडण्यात आले. १७ व्या शतकापर्यंत मंचू सम्राटांनी चीनचे राज्य अंतर्गत मंगोलियापर्यंत विस्तारले, ज्यामुळे भिंतीच्या संरक्षणात्मक संरचनेचे महत्त्व कमी झाले. परंतु, या भिंतीवर अनेकदा आक्रमण झाले आणि प्रत्येक वेळी ती उद्ध्वस्त झाली, परंतु लगेचच ती दुरुस्त करण्यात आली. लोकांचे स्थलांतर सुरू झाले आणि रेशीम मार्गही सुरू झाला, तेव्हा चीनची ग्रेट वॉल सीमेवरील नियंत्रण प्रणाली म्हणून कार्य करू लागली. तिने व्यापाराचे नियमन केले आणि साम्राज्यात येणाऱ्या- जाणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याची सुविधा दिली. या भिंतींमुळे स्थलांतरावरही नियंत्रण ठेवणे शक्य झाले. आज ही भिंत चीनसाठी एक शक्तिशाली सांस्कृतिक प्रतीक म्हणून उभी आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great wall of china history defense purpose svs