जगामध्ये सध्या १९० पेक्षा जास्त देश अस्तित्त्वात आहेत. प्रत्येक देश अन्य देशांपेक्षा निराळा आहे. प्रत्येकाची भौगोलिक परिस्थिती, इतिहास वेगवेगळा आहे. देश चालवण्यासाठी नागरिकांना विशिष्ट नियम पाळावे लागतात. या नियमांची निश्चिती करताना सर्व बाबींचा विचार केला जातो. बहुतांश देशांमधील कायदे ठराविक प्रमाणामध्ये समान असू शकतात. जगातील विविध देशांमध्ये निरनिराळे कायदे तसेच नियम पाहायला मिळतात. यांमधील काही नियम हे चित्रविचित्र स्वरुपात असतात. याबाबतीमध्ये आपला शेजारील देश चीन खूप अग्रेसर आहे. या देशामधील बरेचसे नियम हे आपल्याला विचित्र वाटू शकतात.
दाढी ठेवल्यास होईल शिक्षा
गेल्या काही वर्षांमध्ये दाढी वाढवण्याचा सोशल ट्रेंड पाहायला मिळतो. तरुण पिढी हा ट्रेंड मोठ्या प्रमाणामध्ये फॉलो करत आहे. अनेक धार्मिक समुदायामध्ये दाढी ठेवण्याला फार महत्त्व आहे. लोक सध्या दाढी असलेला लूक कॅरी करण्यावर भर देत आहेत. चीनमध्ये मात्र दाढी वाढवण्यावर बंदी आहे. २०१५ मध्ये चीनमधील एका युवकाने हा नियम मोडला होता. तेव्हा चीनी सरकारने त्याला ६ वर्षांसाठी तर त्याच्या पत्नीला २ वर्षांसाठी तुरुंगामध्ये शिक्षा भोगावी लागली. या प्रकरणामुळे चीनमधील या विचित्र नियमाची माहिती जगभरात पोहोचली.
कॉपी केल्यावर भोगावा लागतो तुरुंगवास
परीक्षेमध्ये कॉपी करत असल्यास चीनी विद्यार्थ्यांना ३ ते ७ वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त त्यांना या कृत्याबद्दल दंड देखील भरावा लागू शकतो. कॉपी करताना पकडल्यास विद्यार्थ्यांना शाळा/महाविद्यालयातून काढून टाकले जाते. परीक्षांबाबत चीनी लोक खूप जास्त सिरीयस असतात. भारतामध्ये कॉपीविषयक कोणत्याही प्रकारचे नियम आढळता नाहीत.
आणखी वाचा – अबब! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
चीनमध्ये आणखी अनेक विचित्र नियम पाहायला मिळतात. जर भारतामध्ये एखादी व्यक्ती पाण्यामध्ये बुडत असेल, तर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी लोक धावत पाण्यामध्ये उड्या टाकतात. चीन देशात पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षा होऊ शकते. तसेच तेथील पोलीस, लष्करातील सैनिक यांना प्रश्न विचारल्यास चीनी नागरिकांवर कारवाई केली जाते. यावरुन या देशामधील नागरिकांचे किती हाल होतात याचा अंदाज लावता येतो.