Halal and Jhatka Meat : मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी झटका मटणाच्या मल्हार प्रमाणपत्राला धोरणात्मक पाठिंबा दिला आहे. मल्हार प्रमाणपत्राच्या या मुद्द्यावरुन वाद रंगला आहे. आपण हलाल मटण आणि झटका मटण म्हणजे काय असतं ते जाणून घेऊ.

हलाल आणि झटका या मटण कापण्याच्या दोन पद्धती

१) मटणासाठी प्राणी कापण्याचे दोन प्रकार आहेत हलाल आणि झटका. त्यावरुनच हलाल मटण आणि झटका मटण असे दोन प्रकार पडले आहेत.

२) हलाल मटण पद्धतीत पशूच्या मानेवर चाकू फिरवला जातो, मात्र शीर धडावेगळं केलं जात नाही. श्वासनलिका कापली गेल्याने शरीरातील सगळं रक्त बाहेर पडतं आणि तडफडून त्या प्राण्याचा मृत्यू होतो. हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी जमीयत उल उलेमा ए हिंद यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र दिलं जातं.

४) हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी कुठलाही सरकारी विभाग प्रमाणपत्र देत नाही. त्यामुळेच आत्तापर्यंत हलाल पद्धतीवर हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे.

झटका मटण म्हणजे काय?

१) विजेचा जोरदार झटका लागतो या वाक्यातूनच मटण कापण्यासाठी झटका हा शब्द आला आहे. या पद्धतीत ज्या प्राण्याचं मांस करायचं आहे तो प्राणी एका झटक्यात कापला जातो. त्यामुळे प्राण्याची रक्त शरीरातून बाहेर पडून तडफड होत नाही.

२) एका झटक्यात प्राण्याची मान त्याच्या धडावेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत. या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जातं. या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण. शीख समुदाय आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात.

हलाल आणि झटका मटण याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय?

“हलाल विरुद्ध मल्हार प्रमाणपत्र असलेलं मटण असा वाद मी ऐकला. मी सांगू इच्छितो की हलाल हा शब्द कायद्याला धरुन आहे. जागतिक पातळीवर हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीट म्हणजे कायदेशीर रित्या असलेलं मटण. पशू बळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो. रक्त साकाळून त्याचं रक्त मिसळणार नाही म्हणून हे केलं जातं. आपल्याकडे जे पशूबळी दिले जातात ते बळी हलाल पद्धतीनेच दिले जातात. तुळजापूरच्या भवानीला जातो, खंडोबाला जातो तेव्हा तिथला खाटिक हलाल पद्धतीनेच बळी देतो. कारण त्याला पशूमधलं रक्त बाहेर काढायचं असतं. झटका ही पद्धत फक्त पंजाब प्रांतात आणि खास करुन शीख समुदायात वापरली गेली.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Story img Loader