हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज हा सर्वमान्य असतो. या वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडेल की नाही, हे सांगता येत नाही. बहुतांशीवेळा ते बरोबर येतात. परंतु, नक्षत्रे आणि त्या नक्षत्रांची वाहनेही पाऊस किती पडेल, कसा पडेल, समाधानकारक असेल की नाही, हे सांगतात. ही नक्षत्रांची वाहने म्हणजे काय ? नक्षत्रांची वाहने कशी ठरतात आणि त्यावरून पावसाचे अंदाज कसे वर्तवले जातात, हे जाणून घेणे रंजक आणि माहितीपूर्ण ठरेल.
नक्षत्रे आणि वाहने
एकूण २७ नक्षत्रे आहेत. या नक्षत्रांमध्ये सूर्य आणि चंद्र दोघेही भ्रमण करत असतात. चंद्राचा कालावधी हा साधारण एक ते दोन-अडीच दिवस असतो. सूर्याचा नक्षत्रामधील कालावधी हा १४ ते १५ दिवसांचा असतो. या प्रत्येक नक्षत्राला वाहन असते. हे वाहन प्राणी असतात. या प्राण्यांवरून पंचांगांमध्ये अंदाज वर्तवलेले दिसतात. भारतामध्ये साधारणपणे साडेचार महिने पाऊस असतो. या कालावधीत ९ नक्षत्रांमध्ये सूर्य भ्रमण करतो. सूर्य ज्या दिवशी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो, त्या दिवशी त्याचे वाहन बदलते. हे वाहन पावसाच्या स्थितीवर बहुतांशीवेळा परिणाम करते.
हेही वाचा : जुलैमधील ‘ते’ २ दिवस; मुंबईकरांच्या जखमा अजूनही ताज्याच; काय घडले त्या दिवशी
नक्षत्रांची वाहने कशी ठरतात ?
नक्षत्रांची वाहने कशी ठरतात याविषयी खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, पावसाळ्यात एकूण ९ नक्षत्रे असतात. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी. त्यासंख्येस नऊने भागावे. बाकी राहील त्यावरून वाहन ओळखावे. १. घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव आणि शून्य बाकी राहिली, तर हत्ती वाहन समजले जाते. घोडा वाहन असता पर्वतावर पाऊस पडेल. कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस अत्यल्प पडेल. मोर, गाढव व उंदीर वाहन असता अल्प व अनियमित पाऊस पडेल. बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?
या वर्षीचा पाऊस आणि नक्षत्रांची वाहने
सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते.यावर्षी गुरुवार, दि. ८ जून, २०२३ रोजी सायं. ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात केला. या नक्षत्राचे वाहन हत्ती होते. नऊ नक्षत्रे, प्रवेशाची तारीख-वेळ आणि वाहन पुढीलप्रमाणे १) मृग – गुरुवार दि. ८ जून सायं. ६-५२ वाहन हत्ती. २) आर्द्रा- गुरुवार दि. २२ जून सायं. ५-४७ वाहन मेंढा. ३) पुनर्वसू- गुरुवार दि. ६ जुलै सायं. ५-२५ वाहन गाढव. ४) पुष्य- गुरुवार दि. २० जुलै सायं. ४-५४ वाहन बेडूक. ५) आश्लेषा- गुरुवार दि. ३ ॲागस्ट दुपारी ३-५१ वाहन म्हैस. ६) मघा- गुरुवार दि. १७ ॲागस्ट दुपारी १-३२ वाहन घोडा. ७) पूर्वा फाल्गुनी- गुरुवार दि. ३१ ॲागस्ट सकाळी ९-३० वाहन मोर. ८) उत्तरा फाल्गुनी- बुधवार दि. १३ सप्टेंबर उत्तररात्री ३-२४ वाहन हत्ती. ९) हस्त- बुधवार दि. २७ सप्टेंबर सायं. ६-५४ वाहन बेडूक. (१०) चित्रा- बुधवार दि. ११ आक्टोबर सकाळी ७-५८ वाहन उंदीर. (११) स्वाती- मंगळवार दि. २४ आक्टोबर सायं. ६-२५ वाहन घोडा.
नक्षत्राचे वाहन आणि पावसाचा अंदाज
बेडूक, मोर, म्हैस, हत्ती असे वाहन असेल तर सर्वसाधारणतः पाऊस समाधानकारक पडतो. घोडा वाहन असेल तर पाऊस पठारी भागात पडतो. गाढव वाहन असेल तर अनियमित, मनमानी पद्धतीने पडतो. उंदीर वाहन असेल तर जमीन भिजवून बीळ खोदता येईल असा पडतो. मेंढा वाहन असेल तर कमी पडतो किंवा थोडा-थोडा पडतो. ज्या प्राण्यांना पाऊस आवडतो, ते वाहन असताना पाऊस चांगला पडण्याची शक्यता असते.
नक्षत्रांनुसार पाऊस आणि पावसाची उपनामे
प्राचीन काळात शेतक-यांनी पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणाऱ्या पावसाप्रमाणे गमतीशीर नावेही ठेवली आहेत. पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस ‘ म्हणतात, तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘ म्हातारा पाऊस ‘ म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘ आसळकाचा पाऊस ‘ म्हणतात. मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो…