विमान प्रवास करताना फोन एअरप्लेन मोडवर ठेवण्यास सांगितले जाते, पण असे का सांगतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जेव्हा तुम्ही विमान उड्डाण दरम्यान तुमचा फोन ‘एअरप्लेन’ (Airplane)मोडवर ठेवत नाही, तेव्हा काय होते हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या..
विमान उड्डाण करताना तुम्ही फोन ‘एअरप्लेन’ मोडवर का ठेवावा?
जेव्हा तुम्ही विमान उड्डाण दरम्यान तुमचा फोन ‘एअरप्लेन’ (Airplane)मोडवर ठेवत नाही, तेव्हा नेटवर्कच्या शोधात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल उत्सर्जित करत राहतो. विमानाच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकते. “आधुनिक विमाने अशी जोखीम कमी करण्यासाठी डिझाइन केलेली असताना, अनेक उपकरणांच्या सतत सिग्नल शोधण्याच्या वर्तनामुळे(signal-seeking behaviour) एकत्रित इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप (cumulative electromagnetic interference) निर्माण होऊ शकतो,” असे राजगोपाल, एव्हिएशन ट्रेनिंग इंडियाचे विमान तज्ज्ञ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
याव्यतिरिक्त, कनेक्शनचा हा सतत शोध तुमच्या फोनची बॅटरी कमी करतो आणि जमिनीवर आधारित सेल टॉवर ओव्हरलोड येऊ शकतो कारण तुमचा फोन आणि टॉवर यांच्यामध्ये विमानाचा वेग आणि उंचीमुळे वेगाने स्विच होत असतो.
हेही वाचा – भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात! ‘या’ गावातील शेतकरी आहेत कोट्याधीश अन् लक्षाधीश
विमान उड्डाण करताना फोनमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी असली तरी, एकाधिक उपकरणांच्या हस्तक्षेपामुळे संवेदनशील उपकरणे किंवा कॉकपिट आणि ग्राउंड कंट्रोलमधील कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतो. “तुमचा फोन एअरप्लेन मोडमध्ये ठेवणे ही विमानावरील प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक साधी परंतु महत्त्वपूर्ण पायरी आहे. हे विशेषतः लँडिंग आणि टेक ऑफ दरम्यान महत्वाचे आहे,” असे राजगोपाल यांनी स्पष्ट केले. “रेडिओ अल्टिमीटर ४ गिगा हर्ट्झ रेंजवर चालतो जे मोबाईलच्या ५G सिग्नलच्या जवळ आहे”.
“फोनद्वारे उत्सर्जित होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रवाशांना थेट हानी पोहोचवू शकत नाही परंतु इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने तणावाची पातळी वाढू शकते, झोपेची पद्धत विस्कळीत होऊ शकते आणि निळ्या प्रकाशामुळे दृष्टी कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अधिक गंभीरपणे, सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्याने प्रवासी आणि क्रू यांच्यातील चिंता वाढू शकते,”असे, हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे क्रिटिकल केअर विभागाचे सल्लागार आणि HOD डॉ मनेंद्र यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
हेही वाचा –जगातील सर्वात महागडा दात कोणाचा आहे माहित्येय का? एका दाताची किंमत आहे….
डॉक्टर काय सांगतात?
डॉक्टर हा वेळ मोबाईलपासून दूर राहण्यासाठी, आराम करण्यासाठी किंवा हलके वाचन किंवा ध्यान करण्यासाठी वापरण्याची शिफारस करतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते. एअरलाइन नियमांचे पालन केल्याने केवळ सुरक्षितताच नाही तर प्रवासादरम्यान आरोग्याला प्राधान्य देण्याची संधीही मिळते.