बॅण्डस्टॅण्ड म्हटले, तर तुम्हाला लगेच वांद्र्याचे बॅण्डस्टॅण्ड आठवत असेल ना. वांद्रे बॅण्डस्टॅण्ड असे म्हटले की, आज बऱ्याच लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते ते शाहरुख खानचे ‘मन्नत’ हे घर आणि त्याबाहेर जमलेली गर्दी. काहींना वांद्र्यातील लव्हर्स पॉइंट आठवतो, तर काहींना वांद्रे बॅण्डस्टॅण्डचा समुद्रकिनारा. पण मुंबईतील खरे बॅण्डस्टॅण्ड नेमके कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का? १५० वर्षांपूर्वी मुंबईत पहिले बॅण्डस्टॅण्ड बांधण्यात आले होते. या बॅण्डस्टॅण्डचा इतिहास आणि त्याच्या नावामागची रंजक कहाणी आज जाणून घेऊ.

मुंबईतील ओरिजनल बॅण्डस्टॅण्ड नेमके कुठे आहे?

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

या परिसराचा बॅण्डस्टॅण्ड म्हणून नेहमीच उल्लेख केला जातो. मात्र, बॅण्डस्टॅण्ड नेमके कुठे आहे, असा प्रश्न मनात येतो. मग या परिसराच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो, तेव्हा मुंबईमध्ये असे कित्येक बॅण्डस्टॅण्ड आहेत हे लक्षात येते. वांद्रे सोडले, तर दादर, भायखळा, मलबार हिल. पण, मुंबईतील ओरिजनल बॅण्डस्टॅण्ड नेमके कुठे आहे? तर, मुंबईचे ओरिजनल बॅण्डस्टॅण्ड हे १५० वर्षांपूर्वी उभे राहिले ते कूपरेज मैदानात. जेव्हा मुंबईचा किल्ला उभा होता तेव्हा त्याची तटबंदी दोन ते तीन मजली इमारतीएवढी होती. त्यामुळे आतमध्ये हवा खेळती राहत नव्हती. हवा आत येत नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप उकडायचे. तेव्हा लोक बाहेर समुद्रकिनारी फेरफटका मारायला येत असत. तुम्हीही आताही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, कूपरेज मैदानात लाकडी स्वरूपातील हे पहिले बॅण्डस्टॅण्ड आहे.

बॅण्डस्टॅण्ड हे नाव मिळण्याचे कारण ?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, बॅण्डस्टॅण्ड हे नाव पडले कसे? तर त्या काळी व्हॉट्सअॅप किंवा नेटफ्लिक्स सोडा; पण मनोरंजनासाठी साधा चित्रपटही नव्हता. तेव्हा इंग्रज कुटुंब इकडे मिलिटरी बॅण्डचे संगीत ऐकण्यासाठी या वास्तूमध्ये यायचे आणि त्यावरूनच या जागेला बॅण्डस्टॅण्ड हे नाव पडले. किल्ल्याच्या बाहेरील परिसरात राहणाऱ्या इंग्रज कुटुंबांची करमणूक करण्यासाठी बॅण्ड पथक सज्ज होते. हे बॅण्ड पथक ज्या ठिकाणी आपल्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम करायचे, त्या जागेला बॅण्डस्टॅण्ड असे नाव मिळू लागले.

हेही वाचा >>‘मिठी’ कोपली, मुंबई बुडाली, माणसं वाहिली; २६ जुलैला नेमकं काय घडलं आणि का घडलं? जाणून घ्या

इंग्रज गेल्यावर बॅण्डचे संगीत शांत झाले; पण या परिसराचे नाव मात्र अजून तसेच आहे. अशी अतिशय रंजक आणि क्वचितच कुणाला माहीत असलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून आपल्याला मिळते.