भारतात फार कमी लोक असतील, ज्यांनी आयुष्यात एकदाही पार्ले-जी बिस्किट खाल्ले नसेल. यामुळे इतके वर्षे होऊनही पार्ले- जी बिस्किटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. अवघ्या ५ रुपयांमध्ये मिळणारे हे बिस्किट बहुतेकांना आवडते. त्यामुळे बिस्किटांचे नाव घेतले तर जिभेवर पार्ले-जी हे नाव आपोआप येते. गरिबांपासून, श्रीमंतापर्यंत आणि गावापासून शहरापर्यंत प्रत्येक वर्गातील लोक हे बिस्किट खातात. ९० च्या दशकातील मुलांसाठी पार्ले जी आणि चहा किंवा दूध हे एक खाण्याचे कॉम्बिनेशन होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजही असे लोक आहे ज्यांची चहा पिण्याची सवय पार्ले-जी बिस्किटाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अतिशय स्वस्त आणि चविष्ट हे बिस्किट केवळ भारतातच लोकप्रिय नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये ते आवडीने खाल्ले जाते.

अमेरिकासारख्या देशातही पार्ले-जी बिस्किटाने अनेकांना वेड लावले आहे. तर पाकिस्तानातही हे बिस्किट लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत अमेरिका आणि पाकिस्तानात पार्ले-जी बिस्किटाची किंमत किती असेल, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये पार्ले-जी बिस्किटाची किंमत किती आहे जाणून घेऊ…

मुंबईतील विलेपार्ले परिसरात सध्या बंद असलेल्या एका कारखान्यातून पार्ले जीची सुरुवात झाली. १९२९ मध्ये मोहनलाल दयाळ या व्यावसायिकाने हा कारखाना विकत घेतला आणि कन्फेक्शनरी बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९३८ मध्ये पहिल्यांदा पार्ले-ग्लुको नावाच्या बिस्किटांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

Aadhaar Update: घरबसल्या ऑनलाइन क्यूआर कोड स्कॅनद्वारे करा आधार कार्ड व्हेरिफाय; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

स्वातंत्र्यानंतर बंद करावे लागले या बिस्किटाचे उत्पादन

स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जी बिस्किटाचे नाव ग्लुको बिस्किट असे होते. मात्र स्वातंत्र्यानंतर त्याचे उत्पादन बंद झाले. याचे कारण देश मोठ्या अन्न संकटाचा सामना करत होता. यात हे बिस्किट बनवण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता. त्यामुळे गव्हाचे उत्पादनच कमी असल्याने आणि इतर देशातूनही गव्हाचा पुरवठा न झाल्याने कंपनीने त्यांचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला.

बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीने बदलले बिस्किटाचे नाव

जेव्हा पार्ले-जीने पुन्हा आपले उत्पादन सुरू केले तेव्हा बाजारात अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या होत्या. विशेषत: ब्रिटानियाचे ग्लुकोज- डी बिस्किट बाजारात मोठ्या प्रमाणात पाय पसरत होते, यामुळे कंपनीने ग्लुको बिस्किटला ‘Pagle-G’ हे नवीन नाव देऊन ते बिस्किट बाजारात आणले.

‘G’ चा अर्थ काय आहे?

१९८० नंतर पार्ले ग्लुको बिस्किटचे नाव छोटे करून ते पार्ले-जी असे करण्यात आले. यानंतर २००० साली कंपनीने ‘G’ म्हणजे ‘Genius’ या टॅग लाइनसह पार्ले-जी बिस्किटाची जाहिरात सुरू केली. पण प्रत्यक्षात पार्ले-जी मध्ये दिलेला ‘जी’ चा खरा अर्थ ‘ग्लुकोज’ असा आहे.

अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये पार्ले-जी बिस्किटाची काय किंमत आहे?

भारतात पार्ले-जी बिस्किटाचे ६५ ग्रॅमचे एक पॅकेट ५ रुपये किमतीला मिळते. एका अहवालानुसार, अमेरिकेत पार्ले- जीचा ५६.५ ग्रॅमचे ८ पॅक येतात ज्याची किंमत १ डॉलर अशी आहे. साधारण या बिस्किटाची किंमत आपल्याकडे १० रुपये आहे. याशिवाय शेजारील राष्ट्र पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात ५ रुपयांना मिळणारे पार्ले-जी बिस्किट सध्या आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० रुपयांना विकले जात आहे. ग्रोसर ॲप वेबसाइटनुसार, पार्ले-जीच्या ७९ ग्रॅम पॅकेटची किंमत २० रुपये आहे. म्हणजे हे बिस्किट भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये महाग विकले जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of parle g parle g biscuit price in america pakistan and india sjr