Eye Strain Due To Laptop:  डोळ्यांना त्रास किंवा थकावट जाणवण्याची समस्या काही वर्षांपूर्वी खूप कमी होती. कारण तेव्हा लोक फक्त टीव्ही स्क्रीनच्या कारणामुळे डोळ्यांना त्रास होत होता. परंतु, बदलत्या वेळेनुसार तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला आहे आणि आता लहान मुले, वृद्ध माणसं आणि तरुण पिढीतील माणसं जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप, कंप्यूटर, मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही पाहताना घातवत असतात. या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढतो.

स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे धोकादायक

स्क्रीनसमोर सतत वेळ घालवल्याने डोळ्यांना थकवा तर जाणवतो, तसंच डोळ्यांमध्ये जळजळ, दृष्टी कमकुवत होणे, डोळ्यांतून पाणी येण्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत घाबरून न जाता सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळू शकतो.

Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश

स्वच्छ पाण्याने साफ करा

कंप्युटर किंवा लॅपटॉपवर सतत काम केल्यामुळे तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल, तर अशावेळी तुम्ही स्वच्छ पाणी एका भांड्यात गरम करा आणि त्यामध्ये कॉटन बॉल्स टाका. आता या रुईच्या तुकड्यांना बाहेर काढा आणि डोळ्यांना शेक द्या. तुम्ही डोळ्यांच्या पापण्यांवरही हे ठेवू शकता ज्यामुळे समस्या दूर होण्यास मदत होईल. रुईमध्ये असेलेले पाणी जास्त गरम नसेल, याची काळजी घ्या. नाहीतर तुमच्या डोळ्यांना इजा होईल.

नक्की वाचा – बिबट्याने पाण्यात राहून नेम धरला अन् काही सेकंदातच मगरीची केली शिकार, थरारक Video पाहून अंगावर काटा येईल

डार्क मोडमध्ये गॅझेटचा वापर करा

आपण नेहमी रात्रीच्या अंधारात मोबाईल किंवा लॅपटॉप सुरु करतो आणि त्याच्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांवर स्ट्रेन पडतो आणि डोळे दुखतात. त्यामुळे या गॅझेट्सला डार्कमोडमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. तसंच थोड्या वेळानंतर डोळ्यांना ब्लिंक करत राहा. लॅपटॉपवर काम करताना थोडावेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. जर डोळे ड्राय झाले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉपचा वापर करा.

बर्फाने डोळे शेकवा

डोळ्यांना थकवा जाणवल्यावर सामन्यत: लोक थंड पाण्याचे थेंब डोळ्यांवर मारतात किंवा चेहरा धुतात. तुम्ही यासाठी बर्फाचाही वापर करू शकता. यासाठी एका कपड्यात बर्फाला गुंडाळा आणि डोळ्याच्या पापण्यांवर ठेवा. अशाप्रकारे डोळे शेकवण्यामुळे खूप आराम मिळेल.