लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कारण यानंतर दोघांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. लग्नानंतरची पहिली रात्र जोडपे एकमेकांसोबत घालवतात त्याला मराठीत मधुचंद्र असे म्हटले जाते. पण आपल्याकडे हनिमून हा शब्द जास्त प्रचलित आहे. अनेक जोडपी लग्नानंतर लगेचच काही दिवस फिरण्यासाठी जातात, मग ते भारतात असो वा परदेशात. यालाही हनिमून असेच म्हटले जाते. हा वेळ जोडप्याला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठीचा असतो.
अरेंज मॅरेज केलेल्या जोडप्यांच्या आयुष्यात हनिमून महत्त्वाची गोष्ट असते, कारण हे जोडपे एकमेकांना ओळखत नसते, त्यामुळे आपल्या जोडीदाराला ओळखता येते आणि त्याच्या आवडीनिवडी समजून घेता येतात. दोघांमध्ये एक चांगला बॉंड निर्माण होतो.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, लग्नानंतरच्या या पहिल्या रात्रीला, किंवा भेटीला हनिमून असे का म्हटले जाते? नाही ना! यात हनी आणि मूनचा यांचा तसा काही संबंध नसताना याला हनिमून म्हणण्यामागे काय लॉजिक असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
हनिमून शब्द आला कुठून?
असे म्हटले जाते की, Hony Moone हा शब्द जुन्या इंग्रजी शब्दावरून आला आहे. यातील Hony हा शब्द लग्नाचा आनंद या अर्थाने वापरला जातो. लग्नानंतर नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा आणि आनंद Hony या शब्दातून दाखवला जातो. यासोबतच जेव्हा युरोपियन रितीरिवाजाप्रमाणे लग्न होते तेव्हा जोडप्याला मध आणि पाण्यापासून बनवलेले एक एल्कोहॉलिक ड्रिंक दिले जाते. या कारणामुळेही हनीचा संबंध या घटनेशी जोडला जातोय.
यातील Moone बद्दल बोलायचे झाल्यास, मून अर्थात चंद्रा हा शारीरिक स्थितीची माहिती देतो असतो, म्हणजे चंद्रोदय होताच आपण दिवसभराची सर्व काम भरभर आटपत लवकर विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतो. या चंद्राच्या आधारे काळाची गणना जाते आणि तो वेळ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच हनी म्हणजे आनंद आणि मून म्हणजे वेळ. म्हणजेच लग्नानंतर जोडप्याने आनंदात घालवण्याचा वेळ म्हणजे हनिमून असा होतो. लग्नानंतरच्या काही दिवसांच्या काळाला हनिमून पीरियड असेही म्हणतात. लग्नानंतर जोडपे एकमेकांसोबत जो काही आनंदाचा क्षण घालवता तेव्हा त्याला हनिमून म्हणतात.
लग्नानंतर फक्त फिरायला जाण्याच्या वेळेलाच नाही तर लग्नानंतरच्या काही दिवसांच्या काळालाही हनिमून पीरियड म्हणतात. यादरम्यान नव विवाहीत जोडपं एकमेकांना समजून घेत असते. फ्रेंचमध्ये त्याला lune de miel म्हणतात. जर्मनमध्ये याला flitterwhochen म्हणतात. ‘हनिमून’ हा शब्द फ्रेंचमध्ये किमान १८ व्या शतकापासून वापरला जात आहे, परंतु १९ व्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीत अधिक सामान्य झाला. हा वेळ जोडप्याने वेगवेगळ्या प्रकारे घालवण्याची परंपरा आहे. हनिमूनमुळे जोडीदारासोबतचे नाते चांगले आणि अधिक घट्ट करता येते.