सुट्टीत फिरण्यासाठी अनेक जण निसर्गरम्य, मजेशीर ठिकाण निवडतात. पण त्या ठिकाणी राहण्यासाठी चांगली व्यवस्था गरजेची असते. अशा वेळी बहुतेक लोक हॉटेल बुकिंग करतात. सहसा हॉटेल एका दिवसासाठी म्हणजेच २४ तासांसाठी बुक केले जाते. यात जर तुम्ही दुपारी २ किंवा ७ वाजता चेक-इन करत असाल, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत तुमची खोली रिकामी करावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही २४ तासांचे भाडे भरता पण तुम्हाला पूर्ण २४ तास खोली मिळत नाही. हॉटेल्सवाले असे का करतात?
हॉटेल्सना रूम स्वच्छ करण्यासाठी मिळतो वेळ
हॉटेलमधून दुपारी १२ वाजता चेक-आउटची वेळ ही कोणत्याही एका शहर आणि राज्यापुरती मर्यादित नाही, तर देशभरातील बहुतेक हॉटेल्समध्ये चेक-आउटसाठी हीच वेळ निश्चित आहे. यामागचे कारण म्हणजे हॉटेलमध्ये एकामागून एक ग्राहक येतच असतात. अशा वेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रूम स्वच्छ करण्यासाठी, बेडवरील चादर आणि इतर गोष्टी बदलून नीट करण्यासाठी आणि आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी वेळ लागतो. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार चेक-आउटच्या वेळेत बदल केल्यास कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागेल आणि वेळेत सर्व रूम स्वच्छ करून नीट तयार करता येणार नाहीत.
ग्राहकांना लक्षात घेता निश्चित करण्यात आली ही वेळ
ग्राहकांच्या सवयी लक्षात घेऊन दुपारी १२ वाजताची वेळ ठरवण्यात आली आहे. सामान्यत: लोक सुट्टीत उशिरापर्यंत झोपतात. त्यांना आरामात उठायला आणि तयार व्हायला दुपारचे १२ वाजतात. त्यामुळे चेकआऊटसाठी सकाळची वेळ ठेवली जात नाही. पण ठराविक वेळेमुळे हॉटेलमधील इतर ग्राहकांनाही थांबावे लागत नाही.
हॉटेल्सच्या सर्व रूम नीट स्वच्छ करता येतात
निश्चित चेकआउट आणि चेक-इनचा आणखी एक फायदा आहे. अशा प्रकारे हॉटेलच्या सर्व रूम अधिक चांगल्या पद्धतीने वापरल्या जातात. सर्व खोल्या एकाच वेळी ग्राहकांना दिल्या जाऊ शकतात. कोणतीही रूम विनाकारण रिकामी राहणार नाही. निश्चित चेक-आउट टाइममुळे हॉटेल कर्मचार्यांना त्यांच्या सेवासुविधांचे प्रभावीपणे नियोजन करण्यास आणि रूमचे वाटप करण्यास सोपे जाते.
हॉटेल्सना काय फायदा होतो?
चेक-आउट निश्चित वेळेमुळे हॉटेलच्या मॅनेजमेंट टीमला सर्व गोष्टींचे व्यवस्थापन सुरळीत करता येते, यामुळे नवीन ग्राहक सहजपणे चेक-इन करू शकतात. नवीन ग्राहकांसाठी रूम वेळेवर तयार असल्याची खात्री पटते. ग्राहकांना लॉबीमध्ये ताटकळत उभे राहण्याची गरज लागत नाही. हे हाऊसकीपिंग आणि इतर हॉटेल सेवांसाठी सुसंगत टाइमटेबल तयार करण्यास मदत होते.