Why There is An Empty Space in the Middle of Blade: आपल्या सर्वांच्या घरात ब्लेडचा वापर केला जातो. विशेषतः पुरुष मंडळी शेविंग करण्यासाठी ब्लेडचा उपयोग करतात. शेविंग करण्यापासून अनेक दैनंदिन कामासाठी ब्लेडचा वापर करण्यात येतो. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्लेड उपलब्ध आहेत. पण ब्लेडच्या मध्यभागी रिकामी जागा कशासाठी असते तुम्ही कधी याचा विचार केलाय का, तुमच्या लक्षात आले असेल की, ब्लेड कोणत्याही कंपनीचे असले तरी त्यांची रचना सारखीच असते. ब्लेडची निर्मिती जगात कुठेही झाली असली तरी या ब्लेडच्या मध्यभागी असलेली रिकामी जागा प्रत्येकच ब्लेडमध्ये एकसारखीच असते. चला तर मग आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिलेट कंपनीचा संस्थापक किंग कॅम्प जिलेटने १९९१ मध्ये विल्यम निकर्सनच्या मदतीने ब्लेडचं पहिलं डिझाईन तयार केलं. त्यावेळी ब्लेडचे डिझाईन तसेच होते जसे आताही तुम्ही बघता. जिलेटने डिझाईन तयार केल्यावर ब्लेडचे पेटंटही घेतले आणि त्यानंतर १९०४ पासून त्याचे उत्पादन सुरू केले. ब्लेडची रचना त्यांनीच केली होती.

(हे ही वाचा: भटके कुत्रे माणसांवर हल्ले का करतात? चावा घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा यावर काय सांगतो…

त्याकाळी ब्लेडचा वापर फक्त शेविंगसाठी केला जात होता, त्यावेळी रेजरमध्ये ब्लेड बोल्टच्या मदतीनं फिट कराव लागत होतं म्हणूनच ब्लेडच्या मध्यभागी असलेली रिकामी जागा अशाप्रकारे बनवली गेली होती. त्यावेळी बाजारात जिलेटशिवाय दुसरी कोणती कंपनी नव्हती. जिलेट ही ब्लेड तयार करणारी एकुलती एक कंपनी होती. त्यामुळे ही रचना त्यांनीच केली होती.

काही काळातच ब्लेडचा व्यवसाय फायदेशीर ठरल्यावर इतर अनेक कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या. त्यावेळी, फक्त जिलेट शेविंग रेझर्स बनवत होती. म्हणून दुसऱ्या येणाऱ्या नवीन कंपन्यांनीही ब्लेडचं जुनचं डिझाईन काॅपी केलं. खरंतर, त्यावेळी रेझर फक्त जिलेट कंपनीचेच येत होतं. त्यामुळे रेझरमध्ये ब्लेड फीट होण्यासाठी मग एकसारखं डिझाईन तयार झाले. त्यामुळे कंपनी कोणतीही असो, रेझरनुसार ब्लेडची रचना सारखीच ठेवावी लागली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How a blade always has the same design of open empty holes all through its middle section pdb