भारतात मोमोची प्रचंड क्रेझ आहे. मसालेदार चिली ऑइलमध्ये बुडवलेल्या मऊ लुसलुशीत मोमोचे प्रेमी भारतात आहेत. साधारणतः मोमोचे दोन प्रकार असतात एक म्हणजे वाफवलेले मोमो आणि दुसरे म्हणजे तळलेले मोमो. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून हे मोमो खा किंवा उत्तम जेवणाच्या आशियाई रेस्टॉरंटमधून. या मोमोजना अनेक नावे दिली गेलेली असतात. आता अगदी मोमोप्रमाणे दिसतात, ते असतात डंपलिंग्स किंवा डिम सम. अनेकांचा असा समज आहे की, मोमो, डिम सम, डंपलिंग व पॉटस्टिकर्स हे पदार्थ एकसारखे असतात. त्यामुळे खरंच हे पदार्थ एकसारखे आहेत की यात काही फरक आहे? त्याविषयी याच क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मोमोज, डिम सम्स, डंपलिंग्ज आणि पॉटस्टिकर्स हे सर्व डंपलिंगचे प्रकार आहेत; परंतु त्याचे मूळ, त्यातील घटक, तयार करण्याची पद्धत, आतील सारण या सर्व पद्धतींमध्ये फरक आहे,” असे पुण्याच्या ‘द ऑर्किड हॉटेल’मधील सॉस शेफ आशियाई शेफ मोहिउद्दीन तुहीन यांनी सांगितले. नेपाळ, तिबेट आणि भारतातील हिमालयीन प्रदेशात मोमोज लोकप्रिय आहेत. पॉटस्टिकर्सची उत्पत्ती उत्तर चीनमध्ये झाली आहे; तर डिम सम हे हाँगकाँग आणि चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या कॅन्टोनीज पाककृतीचा एक भाग आहेत. डंपलिंग्जमध्ये जपानी ग्योझा किंवा कोरियन मांडूसह भिन्नता आढळून येते. डिमसम, डंपलिंग्ज आणि पॉटस्टिकर्स सोया सॉस, व्हिनेगर व चिली ऑइलसारख्या डिपिंग सॉससह खाल्ले जातात.

मोमोज, डिम सम्स, डंपलिंग्ज आणि पॉटस्टिकर्स हे सर्व डंपलिंगचे प्रकार आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘या’ देशात १० वर्षांच्या मुलांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय? यावरून सुरू असलेला वाद काय आहे?

त्यात नेमका फरक काय?

‘फॉर अर्थ सेक कॅफे’चे शेफ वेद गौतम यांनी मोमोज, डिम सम, पॉटस्टिकर्स व डंपलिंग्जमधील फरक स्पष्ट केला.

मोमोज- सर्व मोमो हे डंपलिंग असतात; परंतु सर्व डंपलिंग मोमो नसतात, असे ते म्हणाले. पारंपरिक डंपलिंग्जपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात येणारे मोमो हे गोलाकार किंवा चंद्रकोरीच्या आकाराचे असतात; ज्यांना कडा असतात. त्यांचे वरील आवरण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक सामग्री म्हणजे गव्हाचे पीठ; परंतु त्यात सामान्यतः मैद्याचा वापर केला जातो. टोमॅटो, लसूण, मिरची किंवा काही प्रकारचे सूप घालून तयार करण्यात येणारे मोमोज सामान्यतः सॉस किंवा डिपसह सर्व्ह केले जातात. मोमो हे भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहेत.

पारंपरिक डंपलिंग्जपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात येणारे मोमो हे गोलाकार किंवा चंद्रकोरीच्या आकाराचे असतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

डिम सम- डिम समदेखील डंपलिंग्जचाच प्रकार आहे. डिम सम दिसण्यात पारदर्शक असतात. मुख्यत: विविध पीठ तयार करण्यासाठी आणि नंतर त्यांना आकार देण्यासाठी जे आवश्यक तंत्र लागते, ते तंत्र डिम समला इतर डंपलिंग्जपेक्षा वेगळे करते. डिम समचे आवरण विविध स्टार्च (बटाटा/टॅपिओका कॉर्न/तांदूळ) किंवा मैद्यापासून तयार करता येते. डिम समच्या प्रत्येक आकाराला स्वतःचे नाव दिले जाते. ते अतिशय मऊ असतात आणि याचे आवरणही अतिशय नाजूक असते.

डंपलिंग्ज- डंपलिंग्ज हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. याचे पारंपरिक आवरण गव्हाच्या पिठाने तयार केले जाते आणि ते अतिशय पातळ असते. त्यांचा आकार गोलाकार किंवा कडा असलेल्या चंद्रकोरीसारखा असतो. डंपलिंग्ज अतिशय मऊ आणि चवदार असतात.

पॉट स्टिकर्स- हा डंपलिंग्जचा तळलेला प्रकार आहे. याचा वरील भाग अतिशय मऊ; तर बेस क्रिस्पी असतो.

डंपलिंग्ज हा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : हुकूमशाह किम जोंग उन करणार रशियाची मदत? रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाचा सहभाग किती मोठा? त्याचा काय परिणाम होणार?

तज्ज्ञांच्या मते, वाफवलेले पारंपरिक मोमो हे सर्वांत आरोग्यदायी असतात आणि त्यानंतर वाफवलेले डिम सम आणि वाफवलेले किंवा उकडलेले डंपलिंग. याचे कारण असे की मोमोजमध्ये कमी कॅलरी असतात. कारण- त्यात तेलाचा अतिशय कमी प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे ते जास्त पोषक असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How are momos dim sums dumplings and potstickers different from one another rac