नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या सायंकाळी म्हणजे २५ जानेवारी रोजी सरकारद्वारे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार हे ‘भारतरत्न’ नंतरचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत, जो ‘सार्वजनिक सेवेचा घटक असलेल्या सर्व क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरव’ करण्यासाठी दिला जातो. यंदा जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये एक पद्मविभूषण आणि २५ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वत्र पद्म पुरस्कारांची चर्चा सुरू असताना अनेकांच्या मनात याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तिन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत का? यातील वेगळेपण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया…

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे भारत सरकारद्वारे दिले जाणारे तीन स्वतंत्र पुरस्कार आहेत, जे सार्वजनिक सेवेचा घटक असलेल्या सर्व क्षेत्रांतील कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिला जातो. या पद्म पुरस्कारांची स्थापना सन १९५४ मध्ये करण्यात आली होती आणि १९७८ आणि १९७९ आणि १९९३ ते १९९७ या कालावधीत काही काळाचा अडथळा वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले जातात.

ASADUDDIN OWAISI
मुंबई: ‘एमआयएम’चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
pandit neharu and Mir Osman Ali Khan
हैदराबाद संस्थान भारतात विलीन कसे झाले? ऑपरेशन पोलो काय आहे? जाणून घ्या…
maharashtra geography
UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील मृदा आणि तिचे प्रकार
maharashtra geography, Konkan Coast,
UPSC-MPSC : महाराष्ट्राचा भूगोल : कोकण किनारपट्टी
विज्ञान म्हणजे काय?
कुतूहल : बहुआयामी गणिती भास्कराचार्य
coral reefs
कुतूहल : आरोग्यदायी प्रवाळ

पद्म पुरस्कारांसाठी लोकांचे नामांकन कसे केले जाते?

  • राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, उत्कृष्टता केंद्र इत्यादी पद्म पुरस्कारांसाठी शिफारसी सादर करतात. या नामांकनांचा नंतर पुरस्कार समितीद्वारे विचार केला जातो.
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार समितीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि गृहमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर पद्म पुरस्कार जाहीर केले जातात.
  • पंतप्रधान दरवर्षी पद्म पुरस्कार समिती स्थापन करतात.
  • पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात : पद्मविभूषण (असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी) पद्मभूषण (उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी) आणि पद्मश्री (विविध क्षेत्रातील विशेष योगदानासाठी)

हेही वाचा- दक्षिण कोरियातील पुरुषांना लग्नासाठी मुलीच मिळेनात; भारतातही रखडले विवाह, कारण काय?…

तीन पद्म पुरस्कारांमध्ये फरक काय आहे.

पद्मविभूषण:

कोणत्याही क्षेत्रातील असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न आहे.

पद्मभूषण:

हा पुरस्कार राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय आणि कोणत्याही क्षेत्रातील उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो.

पद्मश्री:

सरकारी कर्माचाऱ्यांनी दिलेल्या सेवेसह कोणत्याही क्षेत्रातील विविध क्षेत्रातील विशेष योगदानासाठी दिला जातो.

पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तीला उच्च पुरस्कार दिला जाऊ शकतो (म्हणजेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तीला पद्मभूषण किंवा पद्मविभूषण मिळू शकतो). असे पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्याच्या पाच वर्षानंतरच होऊ शकते.

विविध क्षेत्रातील कार्य, ज्यासाठी पद्म पुरस्कार दिले जातात.

हेही वाचा- देशातील पहिल्या महिला हत्ती माहूत आणि पद्मश्री विजेत्या पार्वती बरुआ कोण आहेत? जाणून घ्या देशाच्या ‘हस्ती कन्ये’ची कहाणी…

पद्म पुरस्कारांसंबधित सरकारी वेबसाइटनुसार, पद्म पुरस्कारांसाठी विचारात घेतलेल्या क्षेत्रांची यादी येथे आहे :

  • कला (संगीत, चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, सिनेमा, थिएटर इ. समावेश)
  • सामाजिक कार्य (समाजसेवा, धर्मादाय सेवा, सामुदायिक प्रकल्पातील योगदान इ. समाविष्ट आहे)
  • सार्वजनिक व्यवहार (कायदा, सार्वजनिक जीवन, राजकारण इ. समावेश)
  • विज्ञान आणि अभियांत्रिकी (अंतरिक्ष अभियांत्रिकी, अणुविज्ञान, माहिती तंत्रज्ञान, विज्ञानातील संशोधन आणि विकास आणि त्याच्याशी संबंधित विषयांचा समावेश आहे)
  • व्यापार आणि उद्योग (बँकिंग, आर्थिक व्यवहार आणि धोरणे, व्यवस्थापन, पर्यटनाचा प्रचार, व्यवसाय इ. समावेश)
  • औषधोपचार (वैद्यकीय संशोधन, आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध (एक प्रकारची उपचारपद्धती), ॲलोपॅथी, निसर्गोपचार इ. मधील भेद/विशेषीकरण समाविष्ट आहे)
  • साहित्य आणि शिक्षण (पत्रकारिता, अध्यापन, पुस्तक रचना, साहित्य, कविता, शिक्षणाचा प्रचार, साक्षरतेचा प्रचार, शैक्षणिक सुधारणा इ.)
  • नागरी सेवा (सरकारी सेवकांद्वारे प्रशासनातील भेद/उत्कृष्टता इत्यादींचा समावेश आहे)
  • खेळ (लोकप्रिय खेळ, ॲथलेटिक्स, साहसी खेळ, पर्वतारोहण, खेळांचा प्रचार, योग इ. समावेश)
  • इतर (वरील क्षेत्रांशिवाय भारतीय संस्कृतीचा प्रसार, मानवी हक्कांचे संरक्षण, वन्यजीव संरक्षण/संवर्धन इत्यादींचा समावेश असू शकतो.)

हेही वाचा – विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?

पद्म पुरस्कारासाठी कोण पात्र आहे, कोण नाही?

वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. तथापि, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सरकारी कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत. पद्म पुरस्कार निवड निकषांनुसार, हा पुरस्कार केवळ ‘दीर्घ सेवेसाठी’ नसून ‘विशेष सेवा’ साठी दिला जातो.

Story img Loader