ICC Rule on Stumped Out on Wide ball: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये धोनी पत्नी साक्षीबरोबर एक क्रिकेट सामना पाहतानाचा किस्सा सांगत आहे. टीव्हीवर एकदिवसीय सामना पाहत असताना साक्षी आणि त्याचे फलंदाज बाद आहे की नाबाद यावरून चर्चा सुरू होती.

धोनी किस्सा सांगताना म्हणाला, “आम्ही घरी बसून वनडे सामना पाहत होतो. त्यादरम्यान गोलंदाजाने चेंडू टाकला आणि तो वाईड देण्यात आला. फलंदाज तो चेंडू खेळण्यासाठी क्रीझपासून पुढे गेला आणि स्टंपिंगमुळे बाद झाला. तितक्यात साक्षी बोलायला लागली की तो आऊट नाही आहे. तर धोनी म्हणाला की वाईड चेंडूवर फलंदाज स्टंपिगमुळे बाद होऊ शकतो, फक्त नो बॉलवर बाद होऊ शकत नाही. पण साक्षीचं म्हणणं होतं की, फलंदाज आऊट नाहीय कारण तो वाईड बॉल होता. साक्षी मात्र तिचं म्हणणं पटवून देत राहिली आणि फलंदाज मैदानाबाहेर गेला.

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण टॉसच्या आधी १० मिनिटं… संजू सॅमसनने सांगितला किस्सा
Israel-Hezbollah War:
Israel-Hezbollah War: खजिना सापडला! हसन नसरल्लाहच्या बंकरमध्ये सापडले ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम; इस्रायलचा मोठा दावा
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?

हेही वाचा –MS Dhoni: “तुला काही माहित नाही, तू थांब…”, अन् धोनीला पत्नी साक्षी समजावत होती स्टंपिगचे नियम, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

वाईड बॉल असल्याने फलंदाज बाद नाहीय, असं साक्षीचं म्हणणं होतं. पण याबाबत आयसीसीचा नेमका नियम काय आहे, जाणून घेऊया.

वाईड बॉल असूनही फलंदाज स्टंप आऊट झाला. आयसीसीच्या नियमांनुसार, वाइड चेंडूवर फलंदाज स्टंपिंगमुळे बाद होऊ शकतो. जर तो क्रिझच्या बाहेर असेल आणि यष्टिरक्षकाने चेंडूने त्रिफळा उडवला तर अंपायरला फलंदाजाला बाद घोषित करावे लागेल.

फलंदाजी करणाऱ्या संघाची विकेटही पडेल आणि अतिरिक्त धावाही मिळतील. आयसीसीच्या या नियमानुसार वाईड चेंडू बाद झाल्याने दोन्ही संघांना फायदा होईल. फलंदाजी करणाऱ्या संघाला वाइडच्या नियमानुसार एक अतिरिक्त धावही मिळेल आणि चेंडूही मोजला जाणार नाही. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटही मिळेल. येथे दोन्ही पंचांना निर्णय द्यावा लागतो.

हेही वाचा – IPL 2025 लिलावापूर्वी किती खेळाडूंना रिटेन करता येणार? रिटेंशनचे संपूर्ण नियम वाचा एकाच क्लिकवर

गोलंदाजीच्या टोकावरील अंपायर वाइड सिग्नल करतील, तर स्ट्रायकरच्या टोकावरील पंच फलंदाज आऊट असल्याचे संकेत देतील. तर धोनीने सांगितल्याप्रमाणे चेंडू नो बॉल असल्यास फलंदाजाला स्टंपिंग करून आऊट करता येत नाही.