Origins of March Name : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. मार्च महिना म्हणजे वसंत ऋतूची चाहूल असते. हा महिना भारतीयांसाठी अत्यंत खास असतो. महाशिवरात्री, होळी इत्यादी सणवार आणि त्यात आल्हाददायक वातावरण आणखी विलोभनीय वाटते. या महिन्यात खूप जास्त थंडी नसते आणि खूप जास्त ऊन नसते, त्यामुळे हा महिना अनेकांना आवडतो. पण, तुम्हाला माहितीये का, या महिन्याला मार्च हे नाव कसे पडले? हा महिना किती जुना आहे आणि कसा अस्तित्वात आला? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (how did march get its name once it was the the starting month of the year read history of march name)
‘मार्स’ हे नाव रोमन युद्ध देवतेच्या नावावरून घेण्यात आले आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, ”मार्स’या नावावरून हे नाव देण्यात आले, कारण त्या महिन्यात या युद्ध देवतेच्या सन्मानार्थ अनेक सण साजरे केले जातात.
रोमन कॅलेंडरनुसार हा वर्षाचा पहिला महिना यायचा. पहिल्या महिन्याचे नाव काहीतरी चांगले असावे, यामुळे याचे नाव युद्धाची देवता मार्स याच्या नावावरून ठेवण्यात आले. मार्च हा शब्द ‘मार्चियर’ या फ्रान्स शब्दापासून आला आहे. याचा अर्थ चालणे, पुढे जाणे. असं म्हणतात, रोमन साम्राज्यात युद्धाची सुरुवात याच महिन्यापासून सुरू होत असे.
मार्च हा वर्षातील तिसरा महिना कसा बनला?
रोमन राजा नुमा पोम्पिलियस यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिने कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्याचे श्रेय दिले जाते, ज्यामुळे मार्च हा वर्षातील तिसरा महिना बनला. काही धर्मामध्ये आजही १ मार्चला नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. इराणमध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस २१ मार्च रोजी साजरा केला जातो. तसेच ग्रेगोरियल कॅलेंडर स्वीकारल्यानंतर मार्च हा त्या सात महिन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये दिवसांची संख्या ३१ आहे.
मराठी नवीन वर्षाची मार्च महिन्यापासून सुरुवात
हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. यंदा मराठी नवीन वर्ष ३० मार्चपासून सुरू होईल.