Washing Clothes in Ancient Time: आजच्या काळात कपडे धुण्यासाठी अनेक प्रकारचे साबण किंवा सर्फ पावडर उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने कपडे धुण्यास जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि कपडे देखील स्वच्छ होतात. साबण आणि सर्फ खूप नंतर आले, पण त्याआधी लोकं कपडे नेमके कसे धुत असतं हे तुम्हाला माहित आहे का? सुमारे १३० वर्षांपूर्वी भारतात साबण आले. ज्यांना ब्रिटिश कंपनी Leiber Brothers England ने भारतीय बाजारात लाँच केले होते. अशा परिस्थितीत, देशात साबण नसताना लोक आपले कपडे कसे स्वच्छ करायचे ते जाणून घेऊया.
कपडे धुण्यासाठी याचा वापर केला जात होता..
१८९७ साली मेरठमध्ये पहिल्यांदा अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी साबणाचा कारखाना सुरू झाला. पण साबण येण्याआधी, भारतीय लोक त्यांचे कपडे ऑर्गेनिक वस्तूंनी स्वच्छ करायचे आणि यासाठी रेठाचा वापर केला जात असे. राजांच्या वाड्यांमधील बागांमध्ये रेठाची झाडे लावण्यात आली होती. त्याच्या सालींमधून निघणारा फेस कपड्यांमधली घाण साफ करून त्यांना चमकदार बनवत असे. आजही महागडे आणि रेशमी कपडे स्वच्छ करण्यासाठी रेठाचा वापर केला जातो. हे केस धुण्यासाठी देखील वापरले जाते. त्या काळी रिठा सगळ्यांना मिळत नसे, त्यामुळे कपडे धुण्यापूर्वी लोक गरम पाण्यात टाकून ओले करायचे. यानंतर कपड्यांना दगडांवर आपटून साफ केले जायचे. दगड मारून कपडे साफ करण्यात आले. धोबीघाटात आजही जुन्या पद्धतीने साबण आणि सर्फ न वापरता कपडे धुतले जातात.
अशा प्रकारे रीठाचा वापर केला जायचा..
रिठाचा वापर महागडे आणि मऊ कपडे धुण्यासाठी केला जात असे. पूर्वी रिठाची फळे पाणी घालून गरम केली जायची. ज्यामध्ये फेस तयार व्हायचा. मग तो फेस काढून कपड्यांवर लावला जायचा आणि कपड्यांना दगडावर किंवा लाकडावर घासून पॉलिश केले जायचे. त्यामुळे कपड्यांची घाण साफ व्हायची, तसेच कपडे जंतूमुक्त व्हायचे. रीठा ऑर्गेनिक असल्याने त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम व्हायचा नाही.
( हे ही वाचा: जनरल डब्यात जागा न मिळाल्यास स्लीपर क्लासमधून प्रवास करू शकतो का? जाणून घ्या काय आहेत नियम)
वाळूने देखील कपडे धुतले जायचे..
जुन्या काळी कपडे धुण्यासाठी देखील वाळू वापरली जायची. वाळू हे एक प्रकारचे खनिज आहे. ज्यामध्ये सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट असते. ही पांढऱ्या रंगाची पावडर पाण्यात मिसळून त्यात कपडे भिजवायचे आणि नंतर काही वेळाने कपडे घासून साफ केले जायचे.