बार्बी पिंक रंग हा पृथ्वीवरील सर्वात जुना रंग असू शकतो जो प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कारण प्राचीन काळातील लोक त्यांच्या कपड्यांना रंग देण्यासाठी गुलाबी रंग वापरत असे आणि स्वतःला सजवत असत. निर्सर्गाने नेहमीच गुलाबी रंगाच्या विविध छटा दाखवल्या आहेत ज्या प्राचीन खडकांमध्ये, फ्लेमिंगोवर आणि बर्म्युडाच्या गुलाबी-वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण निसर्गातून मानवाच्या दैनंदिन आयुष्यात गुलाबी रंगाचा समावेश होण्यामागे एक सांस्कृतिक महत्त्व आहे जे स्त्री पुरुष भेदभाव, शक्ती, वसाहतवाद आणि सौंदर्याशी देखील संबंधित आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्यावृत्तानुसार गुलाबी रंगाचा इतिहास हा फार सुरुवातीच्या काळातील लोकांनी त्यांच्या कपड्यांमध्ये गुलाबी रंग समाविष्ट करण्यापासून सुरु झाला. हा रंग अँडीज पर्वताच्या शिकाऱ्यांकडून त्यांच्यापर्यंत पोहचला होता. या शिकाऱ्यांनी लाल गेरू वापरून त्यांच्या चामड्याच्या कपड्यांमध्ये गुलाबी रंगांचा समावेश केला होता. लवकरच प्राचीन इजिप्शियन लोकांनी त्यांचे ओठ आणि गाल रंगविण्यासाठी गेरूचा वापर सुरू केला, जो लवकरच सौंदर्य आणि प्रेमाशी जोडला गेला. त्यानंतरच्या काळात गुलाबी रंगद्रव्यांची मागणी वाढली आणि ही मागणी सौंदर्यप्रसाधनांसाठी जास्त होती. लवकरच वसाहतवादी शक्तींनी आर्थिक वाढीसाठी जगभरातील नैसर्गिक आणि मर्यादित संसाधनांचा वापर करण्यास सुरुवात केली. गुलाबी रंग लवकरच वसाहतवादाशी जोडला गेला कारण युरोपीय लोकांनी कोचीनियल कीटक आणि ब्राझीलवुडची लागवड सुरू केली. या लागवडीसाठी गुलाम कामगारांचे शोषण करण्यात आले आणि त्यामुळे पर्यावरणाचा नाश झाला.
TOIनुसार गुलाबी रंग जो काही विशिष्ट रंगद्रव्यांपासून निर्माण केला होता आणि ज्यामध्ये कार्माइन देखील समाविष्ट होते. दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या कोचीनियल कीटकांपासून हे रंगद्रव्य काढले गेले. याच परिस्थितीत या कीटकांची लवकरच लागवड केली गेली. या रंगाचा वसाहतवादाशी थेट संबंध आला कारण ब्रिटीश साम्राज्याने जगाच्या नकाशावर त्याचे प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी त्याच रंगाचा वापर करून नकाशे तयार करून विस्तार करण्यास सुरुवात केली आणि जगभरात त्यांचा चांगला प्रभाव पाडला.
हेही वाचा – पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?
एक फॅशन ट्रेंड जगाने १८व्या शतकात प्रवेश केल्यामुळे, मध्यमवर्गापेक्षा वेगळे दिसण्याची इच्छा असलेल्या युरोपियन श्रीमंत लोकांमध्ये गुलाबी हा फॅशन ट्रेंड बनला. लुई XV ची शिक्षिका, मॅडम डी पोम्पाडोर यांनी लवकरच युरोपियन फॅशन आणि समाजात हा रंग लोकप्रिय केला.
बार्बी पिंकच्या सिझनमध्ये १९५९मध्ये मॅटल हिला बार्बी ब्रँडच्या गुलाबी रंगाच्या छटेसह जोडला गेले, जो तिचा स्वत:चा रंग म्हणून ओळखला जाऊ लागला. जेव्हा बार्बी प्रदर्शित झाला तेव्हा प्रामुख्याने गुलांबी रंगानी वैशिष्ट्यकृत केलेला नव्हता पण १९७० च्या दशकात, जेव्हा बार्बी बनवण्याचा हेतू एखाद्याला प्रेरणा देणे आणि आनंदी राहणे हा होता तेव्हा गुलाबी रंग वापरण्यात आला. कारण गुलाबी रंग म्हणजे एखाद्याला प्रेरणा देणे आणि आनंदी देणारा रंग मानला जातो. लवकरच एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये भरपूर गुलाबी रंग वापरण्यात आला होता. कारण यामध्ये दाखवण्यात आलेले बार्बी लँड एक मजेदार कॉटन कँडी वंडरलँड आहे जे पूर्णपणे कृत्रिम आहे. पण, बार्बी पिंक रंगाचे आकर्षण केवळ एक प्रतीक नाही तर आता अनेकांसाठी एक भावना बनली आहे.
हेही वाचा – Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…
अलीकडेच, मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग अभिनीत ग्रेटा गेरविगच्या ‘बार्बी’ चित्रपटाच्या रिलीजमुळे जगभरात बार्बीची क्रेझ आणि लोकप्रियता दिसून आली. चित्रपटाने सुमारे १४४.२ कोटी युएस डॉलर कमावले आणि स्त्री पुरुष असा भेदभाव मोडून गुलाबी रंगाची आवड परत आणली. ग्रेटा गेरविगच्या मेटा-कॉमेडी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांसाठी पाच नामांकन मिळाले आहेत आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठीही नामांकन मिळाले आहे.