आकाशात उडणारे पक्षी तुम्ही अनेकदा पाहिले असेल. संध्याकाळच्या वेळेला तर पक्षी थव्याने आकाशात उडताना दिसतात. हे पक्षी हवेत थव्याने एकत्र एकाच दिशेने उडताना दिसतात. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का? हे स्थलांतरित पक्षी थव्याने एकत्र उडत असताना एकमेकांवर आदळत कसे नाहीत? तर आज आपण या लेखातून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

डिस्कव्हर वाइल्ड लाइफ वेबसाइटच्या वृत्तानुसार, प्रत्येक पक्षी तीन नियमांचे पालन करतो. थव्यामध्ये एक पक्षी शेजारी असणाऱ्या दुसऱ्या पक्ष्याचे अनुकरण करतो आणि त्याच्या दिशेने उडतो, त्याच्या जवळ राहतो. त्यामुळे त्यांची एकमेकांशी टक्कर होत नाही. ही बाब पक्ष्यांच्या सेन्सरी सिस्टीमवर (Sensory System) अवलंबून असते. हे पक्षी इतर पक्ष्यांचे स्थान आणि हालचाल अचूकपणे ओळखून दिशेमध्ये बदल करतात आणि त्यामुळेच ते एकमेकांवर आदळत नाहीत किंवा त्यांची टक्करसुद्धा होत नाही. पक्ष्यांच्या थव्यात एक मुख्य नियंत्रक असतो; जो गरजेप्रमाणे वारंवार दिशा बदलतो. हा मुख्य नियंत्रक असलेला एकच पक्षी संपूर्ण थव्याची दिशा बदलू शकतो आणि इतर पक्ष्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतो.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

हेही वाचा…“बापरे! मला तर भीती वाटतेय…” मेंदूचा प्रतिसाद; पण छातीत धडधड; जाणून घ्या भीतीमागील गणित

रोममधील स्टर्लिंग फ्लॉक्सचा अभ्यास करणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञांनी पक्ष्यांचा थवा उडताना त्रिमितीय प्रतिमा तयार केल्या; ज्यामुळे पक्षी आणि त्यांच्या जवळच्या पक्ष्यांच्या इतर प्रतिसादांचा मागोवा घेता आला. या प्रतिमांतून असे दिसून आले की, प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या अंतरावरील पक्ष्याशी संवाद साधून, त्याच्या स्थितीचे निरीक्षण करतो. जेव्हा एक पक्षी दिशा बदलतो तेव्हा इतर पक्षी त्याचा संदर्भ बिंदू म्हणून वापर करतो. त्यामुळे दिशाबदल इतर पक्ष्यांच्या हालचालींनुसार केले जातात आणि त्यामुळे या पक्ष्यांच्या थव्यामध्ये असणाऱ्या पक्ष्यांची एकमेकांशी टक्कर होत नाही.

पक्षी आकाशात उडताना एकमेकांना इतक्या लवकर कसे प्रतिसाद देतात. पक्ष्यांच्या प्रतिक्रियेची वेळ सुमारे ३८ मी.से. (38ms) मोजली गेली आहे. तरीही थव्यामधील दिशात्मक बदल १५ मी.से. (15ms) इतके कमी असू शकतात. अशा प्रकारे पक्ष्यांचा थवा हा चकित झालेल्या व्यक्तींच्या प्रतिक्रियेच्या वेळेपेक्षा अगदी जलद प्रतिक्रिया देतो. तर आज आपण या लेखातून पक्षी आकाशात उडताना एकमेकांवर का आदळत नाहीत हे जाणून घेतले.