जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताचे मानले जाते. भारतात दर सेकंदाला शेकडो गाड्या रुळांवर धावतात आणि आजच्या काळात त्या अतिशय चांगल्या तांत्रिक यंत्रणेद्वारे चालवल्या जात आहेत. तुम्हीही भारतीय रेल्वेने कधी ना कधी प्रवास केलाच असेल. रेल्वे स्थानकावर अनेक ट्रॅक असल्याचे तुम्ही पाहिले असतील. ट्रेन एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर कशी पोहोचते? ट्रेनने आपला मार्ग बदलला की बरेच लोक घाबरतात, परंतु ट्रेन आपला ट्रॅक अगदी सहज बदलते. यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेन कशी धावते?

ट्रेनचा ट्रॅक कसा बदलतो किंवा ती कशी वळते हे जाणून घेण्यासाठी आधी ट्रेन कशी धावते हे जाणून घ्यावे लागेल? ट्रेन आतून ट्रॅकला धरून चालते, म्हणजेच ट्रेनचे टायर रुळावर सेट असतात. टायरमधील ट्रॅकचा आतील भाग मोठा असतो, ज्याने ट्रॅकला घट्ट धरून ठेवण्यास मदत होते. या कारणास्तव, ट्रेनचा ट्रॅक ज्या प्रकारे राहतो, त्याच पद्धतीने ट्रेन पुढे सरकते. म्हणजे तुम्ही मानून चला की, जर ट्रेन सरळ असेल आणि तिचा आकार देखील सरळ असेल तर ट्रेन देखील सरळ जाईल.

( हे ही वाचा: ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवेच कपडे का घालतात? असं आहे यामागचे रंजक कारण)

ट्रेन कशी वळते?

ट्रेनचा ट्रॅक सरळ राहतो, पण जिथे वळावं लागतं, तो ट्रॅक थोडा वेगळाच राहतो. तो तुम्ही अनेकदा पाहिला असेल. रुळांच्या मध्ये एक अणकुचीदार लोखंडी ट्रॅक असतो. त्यामुळे येणाऱ्या ट्रेनला दिशा मिळते. हा ट्रॅक थोडीसा वळणदार असतो, यामुळे ट्रेन इथे थोडी फिरवावी लागते किंवा दुसर्‍या ट्रॅकवर हलवावी लागते. येथे लॉक चावीसारखा एक ट्रॅक असतो, जो बाजूला चिकटवला जातो आणि यामुळे ट्रॅकची दिशा बदलते आणि ट्रेन दुसऱ्या बाजूला वळते. म्हणजे हा एक प्रकारे अॅडजस्टेबल ट्रॅक आहे, जो ट्रेनला दिशा देण्याचे काम करतो.

ट्रेन कोण अॅडजस्ट करतं?

ट्रॅक बदलण्यासाठी ट्रॅकमध्ये अॅडजस्टेबल ट्रॅक असतो, मात्र तो ट्रेनच्या रुटनुसार बदलावा लागतो. पूर्वी हे काम रेल्वे कर्मचारी करत असत आणि ते दिवसभर हाताने बदलत असत. मात्र, आता असे होत नाही. आजच्या काळात हे काम यंत्राद्वारे केले जाते. सिग्नल आणि मार्गानुसार यंत्र ते जुळवून घेते आणि त्यानुसार ट्रेनला दिशा मिळते आणि ती वळते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How do trains change tracks day and night this work also done so easily gps
Show comments