कासव हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे जो सर्वात जास्त वयापर्यंत जगतो. कासवांच्या काही प्रजाती १५० वर्षांहून अधिक काळ जगतात. आज आपण कासवांच्या दीर्घ आयुष्यामागील रहस्य जाणून घेणार आहोत. याशिवाय आपण कासवांच्या जैविक प्रक्रियेचीही माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे ते इतके दीर्घ आयुष्य जगतात. कासवांच्या इतर अनेक प्रजातीदेखील जगभरात आढळतात, जे १०० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिलेले बघण्यात आले आहे.

हेही वाचा- आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना ‘या’ देशातील मुली शर्टचं दुसरं बटण का मागतात? जाणून घ्या

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!

कासवांच्या शरीरावर कठोर कवच असते. हे कवच कासवांच्या अवयवांचे बाह्य हल्ल्यांपासून संरक्षण करते. अनेकदा हल्ला झाल्यास, कासव त्यांच्या कवचाच्या आत लपून बसतात. कासवांची लहानपणापासूनच काळजी घेतली तर ते दीर्घायुष्य जगू शकतात. अनेक कासवे १५० वर्षांपेक्षा जास्त जगतात. आता कासव इतकी वर्ष जगतात कसे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेलचीही एक्सपायरी डेट असते! जाणून घ्या वाहन बंद ठेवल्यावर किती दिवसांत इंधन खराब होतं?

शास्त्रज्ञांच्या मते, कासवांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य त्यांच्या डीएनए रचनेत दडलेले आहे. कासवांचे जनुक प्रकार दीर्घकाळापर्यंत त्यांच्या शरीराच्या सेलमधील डीएनए दुरुस्त करत असतात, यामुळे सेलच्या दीर्घायुष्यात मोठी वाढ होते. काही कासवे २५० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचे हे एक मोठे कारण आहे. २५६ वर्षे जगलेल्या अल्दाब्रा कासवांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, चांगल्या जनुकांच्या प्रकारांमुळेच ते इतके दिवस जगू शकले.

हेही वाचा- इटलीतील पिसा टॉवरपेक्षाही जास्त झुकलेले आहे वारणसीतील ‘हे’ अनोखे मंदिर; काय आहे यामागचा इतिहास, घ्या जाणून

२००६ साली एका बेटावर एक कासव आढळून आले होते. या कासवाचे वय ५०७ वर्ष असल्याचे सांगण्यात आले होते. १६ व्या दशकांत चार्ल्स I सिंहासनावर विराजमान असताना या कासवाचा जन्म झाला असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. आत्तापर्यंत सर्वात जास्त काळ जगलेल्या दुसऱ्या कासवाचे नाव अल्दाब्रा कासव आहे. ते सुमारे २५६ वर्षे जिवंत राहिले. अल्दाब्रा कासव आकाराने खूप मोठे होते. त्या काळात हे कासव सेशेल्स बेटावर राहायचे. त्यादरम्यान अल्दाब्रा कासवांवर अनेक संशोधने करण्यात आली, त्यानंतर कासवांच्या दीर्घायुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. दीर्घकाळ आयुष्याव्यतिरिक्त कासवांमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी त्यांना खूप खास बनवतात.